आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप नेता:पावणेदोन कोटीची फसवणूक; नाशकातून भाजप नेत्यांना अटक

पुणे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अटकपूर्व जामीन फेटाळला; नंतर दाेघांना अटक

भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय करण्याचे व जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यावसायिकाची तब्बल पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी नाशिक येथील बांधकाम व्यावसायिक व भारतीय जनता पक्षाचे नेते रत्नाकर पवार याच्यासह दोघांना मंगळवारी नाशिकला अटक केली.

रत्नाकर ज्ञानदेव पवार (५०) असे या भाजप नेत्याचे नाव आहे. त्यासह अशोक परशुराम अहिरे (रा. नाशिक) याला अटक करण्यात आली. या प्रकरणात यापूर्वी चार जणांना अटक करण्यात आली आहे. मोहद्दीस महंमद फारुख बखला यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.बखला यांची टुर्स अँड ट्रव्हल्स व ड्रीम होम कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्यांना फेब्रुवारी २०१७ मध्ये आरोपी अनिस मेमन याने इतर आरोपींशी ओळख करून दिली. त्या वेळी रत्नाकर पवार याच्या मालकीच्या गिरणा इंफ्रा प्रोजेक्ट व इतर ठिकाणी पैसे गुंतविल्यास भरपूर फायदा मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यानुसार त्याच्याशी करारही करण्यात आला. व्यवसायासाठी त्यास फिर्यादी यांनी वेळोवेळी एक कोटी ६४ लाख १६ हजार ३८७ रुपये दिले. त्यानंतर पवार व त्याच्या साथीदारानी ज्या प्रकल्पासाठी पैसे घेतले, त्यासाठी न वापरता त्याचा उपयोग स्वत:साठी केला. त्यामुळे फिर्यादी यांनी वारंवार पैसे देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना यापूर्वीच अटक केली.

अटकपूर्व जामीन फेटाळला; नंतर दाेघांना अटक
दरम्यान, पवार याने सत्र न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला होता. लॉकडाऊनमुळे थांबलेले सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर दोन जून रोजी पवार याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे
भागीदारीत बांधकाम व्यवसायाचे व जादा नफा मिळवून देण्याचे आमिष

बातम्या आणखी आहेत...