आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:दर्जेदार फर्निचर बनविण्याचे बहाण्याने 52 लाखांची फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील भूगाव परिसरातील एका बंगल्याचे इंटेरिअर व प्लायवुड फर्निचरचे दर्जेदार काम करण्यासाठी आणि उच्च प्रतीचे सामान वापरण्याकरिता 67 लाख 31 हजार रुपये आर्क्टिकट आणि सुताराने घेतले. परंतु संबंधित बंगल्यात कमी प्रतीचे मेटेरिअल वापरुन घरमालकाची फसवणुक करत 52 लाख 31 हजार रुपयांची आर्थिक फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात देबश्री धतक आणि कन्हैयालाल सुतार यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वैशाली विजय सावंत (वय-70,रा.काेथरुड,पुणे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सावंत या पतीसह काेथरुड येथे रहाण्यास असून त्यांचा मुलगा अशिष सावंत हा न्युझीलंड येथे नाेकरी निमित्ताने राहताे आणि अधुनमधुन भारतात येत असताे. काेथरुड येथील त्यांचे इमारतीतील सॅम्पल फ्लॅटचे काम देवर्षी व तिची मैत्रिण यांनी केल्याचे बिल्डरने सांगितले. त्यामुळे त्यांनी देबश्री हिच्याशी संपर्क केल्यानंतर तिने इंटेरिअर डिझाईन करणे व मजुर पुरविण्याचे कामाचे दाेन लाख रुपये 2016 मध्ये घेतले हाेते. त्यानंतर भुगाव येथील मुलाचे फार्म हाऊस बंगल्याचे सर्व काम करण्याचे ठरले. फाॅल सिलींग, फर्निचर, प्लम्बिंग, सिव्हील वर्क, इलेक्ट्रीक्ल, लिफ्ट बसवणे, हाेम थियटर, पडदे अशा विविध कामाबाबत देवबश्री हिच्याशी बाेलणे झाले हाेते. जानेवारी 2017 मध्ये तिला काम देण्यात आले आणि तिला चांगल्या दर्जाचे सामान वापरुन काम करण्यास स्पष्टपणे सांगितले. त्यावेळी तिने ते मान्य केले परंतु त्यावेळी कामाबाबत अॅग्रीमेंट झाले नव्हते. त्यानंतर तीच सर्व काम करणार असल्याने तिने काॅस्टिंगशीट पाठवून बंगल्याचे काम कन्हैयालाल सुतार याचे मदतीने सुरु केले. फर्निचरचे कामाकरिता मरीनप्लाय वापरण्यास सांगूनही तिने ते वापरले नाही. अशिष सावंत हा भारतात आल्यावर त्यांनी फर्निचरचे स्मॅपल काढून ते तपासणी केले असता, ते साधे प्लाय असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत सुतार आणि देबश्री यांना सांगितले असता त्यांनी 15 लाख रुपये परत केले परंतु उर्वरित पैसे अद्याप पर्यंत परत न करता 52 लाखांची फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलीस निरीक्षक उमेश माळी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...