आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक प्रकार:पोलिस भरतीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक, तोतया पोलिसांचा डाव उघड

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुकंपा तत्त्वावर पोलिस दलात नोकरीचे आमिष दाखवून तोतया पोलिसाने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तोतयाने विद्यार्थ्यांचे पैसे आणि लॅपटॉपही पळवून नेले आहेत. हा प्रकार हिंगणे होम कॉलनीत घडला आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

याप्रकरणी विकी अनिलराव मुळे (रा. हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) याने वारजे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चिन्मय मोहन देवकाते (रा. ता. म्हाडा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी त्याच्या तीन मित्रांसह हिंगणे होम कॉलनीत राहतो. पोलीस खात्यात नोकरीला असल्याची बतावणी करुन एकजण त्यांच्या खोलीवर राहण्यास आला होता. तो नेहमी पोलिस गणवेशात असायचा. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले चांगले संबंध असून त्यांना पैसे देऊन आपण अनुकंपा तत्वावर पोलिसांची नोकरी लावून देतो, असे त्याने या मुलांना सांगितले.

मोबाइल व लॅपटॉपही पळवले

त्याच्यावर विश्‍वास ठेवून पाच जणांनी त्याला नोकरीसाठी एक लाख रुपयांहून अधिक रक्कम दिली. त्यानंतर मात्र तो टोलवाटोलवी करायला लागला. या मुलांना संशय निर्माण झाला. ही बाब त्याच्या लक्षात आल्यावर तो पसार झाला. त्यानंतर, ही मुले बाहेर गेल्यावर त्यांचे मोबाइल व लॅपटॉपही त्याने पळवले. त्याची काही छायाचित्रे पोलिसांच्या हाती लागली असून त्याआधारे वारजे पोलिसांनी तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...