आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:पॅन कार्ड लिंकच्या बहाण्याने फसवणूक

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँक अकाउंट बंद होऊ नये यासाठी पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्यासाठी मोबाइलवर लिंक पाठवून नंतर तक्रारदाराच्या मोबाइलवर आलेला ओटीपी प्राप्त करून खात्यातून तब्बल २ लाख २५ हजार काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी झारखंड आणि दिल्ली येथील दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद दास (रा. झारखंड) आणि दीपांशू गुप्ता (रा. दिल्ली) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रदीप बालम सिंग (४०, रा. खडकी, येरवडा) यांनी फिर्याद दिली. हा प्रकार १७ सप्टेंबर रोजी घडला असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.

बातम्या आणखी आहेत...