आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस कारवाई:क्रिप्टाेकरन्सीच्या नावाने फसवणारा अटकेत

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांना क्रिप्टाेकरन्सीत गुंतवणूक केल्यास चांगल्या प्रकारे परतावा मिळेल असे आमिष दाखवून काेट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यावसायिकावर अखेर पुणे सायबर पाेलिसांनी कारवाई केली. बिटकनेक्ट कंपनीचा प्रमुख सतीश कुंभाणीसह त्याच्या सतीश जवेरिया, रणजित सक्सेना, दिव्येश दर्जी, वीरेश चरंतीमठ, रंकेश दर्जी, मेहुल पाचीगर या सहा साथीदारांवर याप्रकरणी पाेलिसांनी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सायबर पाेलिस ठाण्यात दिनेश अशाेक आेतारी (रा. काेंढवा, पुणे) यांनी तक्रार दाखल केली. सदर प्रकार जानेवारी २०१६ ते जून २०२१ यादरम्यान घडलेला आहे. व्यावसायिक सतीश कुंभाणीला अमेरिकन पाेलिसांनी काही महिन्यापूर्वी अटक केली हाेती व ताे सध्या जामिनावर बाहेर आहे. सतीश कुंभाणी व त्याच्या साथीदारांनी मिळून संगनमताने कट रचून एटीसीसी काॅइन, डीकॅडाे काॅइन व इतर खाेट्या क्रिप्टाेकरन्सीत गुंतवणुकीतून माेठा परतावा मिळेल अशी खाेटी आमिषे दाखवली. पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक एस. नेमाणे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...