आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअरविषयी मोफत मार्गदर्शन:'कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स' क्षेत्राबाबत तज्ज्ञ देणार माहिती, नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावी व पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स' मध्ये करिअरच्या संधी या विषयावर द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे चॅप्टरतर्फे विनामूल्य मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. ६) दुपारी ४ ते ६ या वेळेत सीएमए भवन, विकास मित्रमंडळ चौकाजवळ, कर्वेनगर येथे हे सत्र होणार आहे. हे मार्गदर्शन सत्र विनामूल्य आहे. मात्र, नियोजनासाठी नोंदणी आवश्यक असून त्यासाठी pune.admin@icmai.in या ईमेलवर नोंदणी करावी, अशी माहिती 'आयसीएआय, पुणे चॅप्टर'चे चेअरमन सीएमए प्रसाद जोशी यांनी दिली.

'आयसीएआय'चे केंद्रीय समिती सदस्य सीएमए नीरज जोशी, विभागीय समितीचे खजिनदार सीएमए चैतन्य मोहरीर, प्रॅक्टिसिंग कॉस्ट अकाउंटंट सीएमए अमित शहाणे, सॅप इम्प्लिमेंटेशन सल्लागार प्रा. मोरेश्वर आपटे हे या सत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधीविषयी मार्गदर्शन व माहिती देणार आहेत. 'आयसीएआय, पुणे चॅप्टर'च्या व्हाईस चेअरमन सीएमए स्मिता कुलकर्णी, सचिव सीएमए नागेश भागणे, खजिनदार सीएमए निलेश केकाण यावेळी उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कोणत्या क्षेत्रात काय संधी आहेत, असा मोठा प्रश्न असतो. त्याचे शंका निरसन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजिला आहे. 'सीएमए' म्हणजे काय? 'सीएमए'चे महत्त्व, 'सीएमए'नंतर विविध क्षेत्रातील संधी, याचा अभ्यास कसा करावा, अशा वेगवेगळ्या बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थी व पालकांनी या सत्राचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...