आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:लग्नानंतर आपल्यासोबत फिरत नसल्याने मित्राने मित्राचा खून करून मृतदेह पुरला, पुण्यातील हांडेवाडीची घटना

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हांडेवाडी परिसरात बेपत्ता झालेल्या २० वर्षीय तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह मातीत पुरून टाकल्याच्या प्रकरणाला नवीन वळणे मिळाले असून लग्न झाल्यानंतर मित्र आपल्यासोबत फिरत नसल्याने त्याचा खून केला. याबाबत आरोपीच्या मित्रांनी पोलिसांना ही माहिती दिली आहे.

किरण रोहिदास हांडे (२०, रा. उरूळी कांचन) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खून व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मृताचा मित्र सतीश चव्हाण (रा. हांडेवाडी, पुणे) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राेहिदास मारुती हांडे यांनी तक्रार दिली आहे. किरण याचा प्रेमविवाह झाला होता. तो हांडेवाडी परिसरात पत्नीसोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याचे आईवडील पुण्यात राहतात. तो एका गॅरेजमध्ये काम करत होता. त्याला याच परिसरातील तीन ते चार मित्र आहेत. शुक्रवारी रात्री तसेच शनिवारी तो घरी न आल्याने त्याच्या पत्नीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात ताे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

हांडेवाडी येथील पाटील व्ह्यू सोसायटीच्या मागील बाजूला मोकळ्या मैदानात किरण हांडे बेपत्ता हाेण्यापूर्वी मित्रांसाबत दारू पित बसला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होेती. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली असता किरण याचा मृतदेह आढळला. सतीश विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून करण याचे लग्न झाल्यापासून ताे सतीश साेबत फिरत तसेच बोलत नव्हता, या कारणावरून त्याने करणच्या डाेक्यावर वार करून वायरने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरला, अशी माहिती सतीशच्या मित्रांनी पोलिसांना दिली.

बातम्या आणखी आहेत...