आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोस्त दोस्त ना रहा..:मित्राच्याच प्रेयसीवर जडला जीव! संतापलेल्या तरुणाने केले चाकूने सपासप वार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या प्रेयसीवर मित्राचे प्रेम जडल्याने पुण्यात संतापलेल्या तरुणाने साथीदारांना हाताशी धरुन स्वतःच्याच मित्रावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. चाकू व कोयत्याने हा हल्ला झाल्याने मित्र गंभीर जखमी झाला. हि धक्कादायक घटना 4 जूनला पहाटे साडेतीनच्या सुमारास वानवडीतील न्यू कमांड हॉस्पिटलजवळ घडली. या प्रकरणी रविवारी (ता. 5) या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणात मोसीम सलीम शेख, इरफान इम्तीयाज खान या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात मोसीनला अटक करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या हल्ल्यात साहील गुलाब शेख हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यात जखमी साहिलतर्फे त्याचा दुसरा मित्र नदीम सय्यद यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

काय आहे प्रकरण?

साहिल, इरफान आणि नदीम एकमेकांचे मित्र आहेत. इरफानने त्याच्या प्रेयसीची ओळख साहिलसोबत करून दिली होती. पण हि ओळख इरफानच्या अंगलट आली. त्याच्याच प्रेयसीवर साहिलचे प्रेम जडले आणि दोघांत प्रेम संबंधही निर्माण झाले. हि बाब इरफानला समजताच तो चांगलाच भडकला. मनात खदखद असल्याने साहिलला धडा शिकवण्याचा मनोमन त्याने बेत आखला.

असा केला हल्ला

काहीही करुन साहिलला धडा शिकवायचा हे त्याने त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्यांना सांगितले त्यानंतर इरफानने मित्र मोसीमला सोबत घेतले. 4 जूनला पहाटे साडेतीन वाजता साहिल नदीमसोबत दुचाकीवरून चहा पिण्यास निघाल्याची माहिती इरफानच्या मित्राला मिळाली. त्याने साथीदारांना बोलावून घेत गोळीबार मैदान रस्त्यावरील न्यू कमांड हॉस्पीटलनजीक साहिल आणि नदीमला अडवित वाद घातला.

इरफानने केले सपासप वार

इरफानच्या प्रेयसीसोबत प्रेम संबंधांवरुन जाब विचारून त्याने व सहकाऱ्यांनी मिळून साहिलवर चाकू आणि कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. डोक्यात, खांद्यावर व बरगडीवर वार बसल्याने साहिल गंभीर जखमी झाला यानंतर हल्लेखोर पसार झाले. दरम्यान साहिलला त्याच्यासोबतचा मित्र नदीम याने रुग्णालयात भरती केले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. जी. गायकवाड करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...