आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजंदारीवर घरफोड्या:'एमपी'मधून येऊन पुण्यात मारतात घरावर डल्ला; आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

मंगेश फल्ले । पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात मागील काही दिवसांपासून वारंवार घरफोडीच्या घटना वाढत आहे. या अनुषंगाने चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या टोळीचा माग काढण्याचा दृष्टीने कसून तपास करत मध्यप्रदेशमधून सात आरोपींना अटक करत आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

मात्र, संबंधित आरोपींचा तपासात मध्यप्रदेश मधून दैनंदिन एक हजार ते दोन हजार रुपये अशा रोजंदारीवर वेगवेगळ्या टोळ्या पुण्यासह राज्यभरात येऊन घरफोड्यांचे प्रकार करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

नक्की प्रकरण काय?

मध्यप्रदेश मधील धार जिल्ह्यात कुकक्षी तालुक्यात तांडा, पिपरानी, टाण्डा,खनिआंबा,नरवली यासारख्या अनेक गावा मधील बेरोजगार तरुणांच्या टोळ्या देशभरातील विविध भागात जाऊन घरफोड्या करत असल्याने पोलिसांच्या तपास यंत्रणा समोर नवीन आवाहन निर्माण झाले आहे. जंगली प्रदेशात दुर्गम भागात वाड्या वस्त्यांवर या टोळ्या मधील सदस्य वास्तव्य करत असल्याने आणि मोबाईल सारख्या गोष्टीचा वापर करत नसल्याने त्यांचा माग काढणे जिकरीचे होते. संबंधित टोळीची घरफोडी करण्याची पद्धत अशी आहे की, या टोळीत पाच ते सहा सदस्य असतात. यात प्रमुख एक किंवा दोन सदस्य असतात आणि ते टोळीत तीन ते चार लोकांना घरफोडी चोऱ्या करण्यासाठी दैनंदिन रोजंदारीवर घेऊन ट्रॅव्हल्सने पुणे, पिंपरी चिंचवड, पनवेल, रायगड आदी भागात येतात. मात्र, शहरात आल्यावर कोणत्याही लॉज, एका वाहनाचा वापर ते करत नाही. सार्वजनिक शौचालय वापर करून सार्वजनिक ठिकाणावरील फुटपाथवर ते राहतात.

पोलिसांसमोर नवे आव्हान

कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी वाहने बदलत जाण्याची पद्धत वापरतात. रेकी करण्यासाठी कुठे ही एकत्रित न जाता दोन दोनच्या गटाने वावरतात त्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांना आव्हानात्मक असते. मध्य प्रदेश राज्यातील हे सराईत गुन्हेगार विकेंडला शहरातील नदी, ओढा पात्रालगत असलेल्या सोसायटी मध्ये घरफोडी करण्यासाठी नदीपात्रात येवुन थांबत असत व मच्छर चावु नये म्हणुन अंगाला लोशन व चिखल लावुन थांबत होते. त्यानंतर आरोपी हे रात्री शांतता झाल्यानंतर सोसायटीच्या पाठीमागील कंपाऊडचे मागील बाजुस तारा कट करून त्यामधुन प्रवेश करुन सदर सोसायटी मध्ये प्रवेश करुन घरफोडी करीत होते. चोरी झाल्यानंतर आरोपी हे उजेडे पर्यंत ओढयात बसून राहत आणि नंतर वाहनाचा वापर न करता ते पायी चालत जावुन लॉजवर न राहता टेकडया व फुटपाथवर आश्रय घेत होते.तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रूपेश चाळके ,पोलीस अंमलदार, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, श्रीकांत वाघुले, बाबा दांगडे यांनी पहाटे सलग दोन ते तीन आठवडे चोरी झालेल्या सोसयटीच्या परिसरात आणि ओढ्याच्या पात्रात पाळत ठेवून, रात्रीच्यावेळी आरोपी हे घरफोडी करुन जात असताना मध्य प्रदेशच्या सात आरोपींना रंगेहात पकडले.

बातम्या आणखी आहेत...