आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामोद्योग सहकारी संस्थांना संपूर्ण सहकार्य:बळकटीकरणासाठी सहकार विभाग मदत करेल -सहकार आयुक्त अनिल कवडे

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका ग्रामोद्योग सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकार विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील, असे प्रतिपादन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी शुक्रवारी केले.

भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'तालुका ग्रामोद्योग सहकारी संघाचे सक्षमीकरण' या विषयावरील आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविंद्र साठे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे, महाराष्ट्र राज्य बलुतेदार संस्था संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव आदमाने आदी उपस्थित होते.

कवडे म्हणाले, विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग सहकारी संस्थांच्या सचिवांच्या संबंधित निकष निश्चित करण्यासाठी १४ मार्चला संयुक्त बैठक आयोजित केली आहे. संस्थांचे कर्ज पुरवठा, ठेवी, व्याजदर, कर्ज व्यवस्थेत प्राथमिक स्वरूपाचे मुद्दे सोडविण्यासाठी प्रमुख बँकांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. त्यासाठी संस्थांनी सर्व मुद्द्यांची अभ्यासपूर्ण, अटी व नियमाला अनुसरून मांडणी करावी.

सहकारी संस्था स्वयंपूर्ण होण्यासाठी योजनांचा अभ्यास करून त्या सभासदांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. ग्रामोद्योग संघांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे जरुरी आहे. व्यवस्थेची बलस्थाने, कच्चे दुवे, संधी आणि धोके तसेच भविष्यातील आव्हाने लक्षात घेवून उत्पादन प्रक्रियेत अभ्यासपूर्ण बदल करावा. संपूर्ण व्यवस्थेत मूल्यांची जोड, प्रामाणिकपणा, तंटामुक्तता असावी आणि मूल्यांचा विकास व्हावा. आपली संस्था स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य बलुतेदार सहकारी संस्था फेडरेशन मर्या. पुणेचे अध्यक्ष सुभाष पाटोळे, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, विविध संस्थांचे चेअरमन, सचिव आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...