आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वढू:वढूतील संभाजीराजेंच्या स्मारकासाठी 269 कोटी 34 लाख रुपयांचा निधी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अष्टविनायक विकास आराखडा आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील स्मारक व वढू बुद्रुक येथील समाधी स्थळाच्या विकास आराखड्याला रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन पुणे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३३ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या अष्टविनायक विकास आराखड्यास आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील स्मारक आणि वढू बुद्रुक येथील समाधिस्थळाच्या २६९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. बैठकीस राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...