आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपीला 6 कोटी 63 लाखांचा निधी:पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सुविधांसाठी होणार खर्च

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढी एकादशीनिमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्हयातून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यासोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी भाडेतत्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्याकरीता 6 कोटी 73 लाख 20 हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषद यांना राज्य शासनाने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदने केली होती. शासनाने त्यास मंजुरी दिली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

शासनाने दिली मंजुरी

विधानमंडळाच्या सन 2017-18 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरती स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी सन 2017-18 पासून निधी उपलब्ध करुन देणेबाबत मंजुरी दिलेली आहे.

त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी भाविकांकरीता तात्पुरते स्वच्छतागृह भाडेतत्वावर उभारण्याकरीता सहा कोटी 73 लाखांचा निधी मिळावा अशी विनंती केली होती. सदर निधी उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार

ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत सन 2022-2023 या आर्थिक वर्षाकरिता ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरिता अनुदान (रु. 2 कोटी ते रु. 25 कोटीपर्यंत ) 31 सहायक अनुदाने (वेतनेतर) या योजनेतंर्गत एकूण रु. 225.00कोटी एवढा निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे.

सदर अर्थसंकल्पीत तरतूदीमधून आषाढी एकादशीनिमित्त विविध संतांच्या पालख्यासोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी भाडेतत्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करणेकरीता सदर निधी मंजूर करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...