आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह साथीदारांना सहा महिन्यापूर्वी अटक केली होती. मात्र पोलीस तपासात मारणे यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा मिळून आलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रात मारणे विरोधात पुरावे नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गजा मारणे याचा कारागृह बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया लवकर पूर्ण करू असे मारणे याचे वकील विजय ठोंबरे यांनी सांगितले आहे.
कोथरूड परिसरातील व्यवसायिकाचे मोटारीतून अपहरण करून 20 कोटींची खंडणी मागणाऱ्या गुंड गजा उर्फ महाराज मारणे टोळीविरुद्ध मागील वर्षी मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती. गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे रा. हमराज चौक शास्त्रीनगर कोथरुड पुणे ( टोळी प्रमुख ) सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप (वय 43 रा धनकवडी ), हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील (वय 39 रा. बुरली ता. पलुस जि. सांगली), अमर शिवाजी किर्यत( वय 46 रा. कोडोवली ता. जि. सातारा), फिरोज महम्मद शेख (वय 50 रा. समर्थनगर कोडोवली ता. जि. सातारा), रुपेश कृष्णाराव मारणे. (रा. नव एकता कॉलनी शास्त्रीनगर कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पावर (रा. दापोडी,पुणे), अजय गोळे (रा. नर्हे,पुणे), मथुर जगदाळे रा. आंबेगाव पठार, मानसिंग ऊर्फ सुमत मोरे (रा. सातारा), नितीन पौगारे (रा. सातारा), प्रसाद खडागळे (रा. तळजाई पठार सहकारनगर) , नवणे पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे होती.
याप्रकरणी इतर आरोपी विरोधात पोलिसांनी सोमवारी विशेष सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, यावेळी टोळीचा प्रमुख असलेल्या गजा मारणे विरोधात कोणताही सबळ पुरावा आढळून आलेले नसल्याचे तसेच त्याचा या घटनेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगत मारणे विरोधात दोषारोप पत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे याप्रकरणी मारणे यांना जामीन मिळावा यादृष्टीने कायदेशीर दृष्ट्या लवकर प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती मारणेचे वकील ॲड विजय सिंह ठोंबरे यांनी दिली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.