आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेरवडा मध्यवर्ती कारागृहात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगार गजानन मारणे टोळीतील काही गुन्हेगारांनी येरवडा कारागृहात गोंधळ घातला आहे. संबधित आरोपीने एकाच्या डोक्यात पाट घातल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात विविध बराकीत मोक्का कारवाई केलेले वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळीतील ७०० ते ८०० गुन्हेगार बंदिस्त आहेत. मोक्का कारवाई केलेला गुन्हेगार न्यायालयीन कोठडीत बंदिस्त आहेत. कारागृहात बुधवारी दुपारी कॅरम खेळत असताना दोन कैद्यांमध्ये वाद झाला. त्यावेळी कारागृहातील रक्षकांनी भांडणे सोडवली आणि त्यानंतर सर्वांना जवळील बराकीत बंद करण्यात आले होते.
दरम्यान, बुधवारी रात्री कैदी तपासणी सुरू असताना, गुंडांच्या टोळीमध्ये पुन्हा वाद उफाळला. यावेळी एकाने दुसऱ्या टोळीच्या गुन्हेगाराच्या डोक्यात पाट घातल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. यावेळी कारागृह रक्षकांनी भांडणे सोडवली आणि त्यानंतर संबंधित सर्व गुन्हेगारांची वेगवेगळ्या बराकीत रवानगी करण्यात आली. याबाबत येरवडा कारागृहातील अधीक्षक राणी भोसले म्हणाल्या, याप्रकारा नंतर रात्रीआवश्यक ती काळजी घेऊन कैद्यांना आता वेगवेगळ्या बराकीत ठेवण्यात आले आहे. त्यांचे जबाब घेऊन येरवडा पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
तरुणीशी छेडछाड करत जीवे मारण्याची धमकी देणारा संशयित जेरबंद
एका तरुणीची छेड काढून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीस गुन्हे शाखेने पकडले.सोहेल सलीम मुल्ला (वय २२, रा. विमाननगर,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोहेल एका तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. तरुणीने त्याला जाब विचारल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन सोहेल पसार झाला होता. तरुणीने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाकडून सोहेलचा शोध घेण्यात येत होता. तो सोमवार पेठेत मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी निलेश साबळे आणि इम्रान शेख यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल पवार, अयाज दड्डीकर, अण्णा माने आदींनी ही कारवाई केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.