आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिटकॉईन नावाने पुण्यात गंडा:19 लाखांची फसवणुक करणारा मुख्य आरोपी जेरबंद

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिटकाॅईन देताे असे अमिष दाखवून एका व्यवसायिकाकडून 19 लाख 70 हजार रुपये घेऊन त्यास बिटकाॅईन न देता सदर रकमेचा अपहार केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी प्रमुख सुत्रधाराच रायगड जिल्हयातील कर्जत येथून जेरबंद केल्याची माहिती शनिवारी दिली आहे. प्रियेश ऊर्फ मुकुल अनिल राव (वय-34,रा.दहीवली, ता.कर्जत, रायगड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे.

आराेपी मुकुल याचे ताब्यातून पोलिसांनी एकूण सात माेबाईल व दहा सिमकार्ड जप्त केले.वेगवेगळया बँकाचे 18 बँक खाते पासबुक, वेगवेगळया बॅंकेचे आठ डेबीटकार्ड व एक क्युआर काेड असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती दिली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांकडे कुलीद कदम (36,रा.शनिवार पेठ,पुणे) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कुलदीप कदम यांचे कंपनीचे ऑफीस शिवाजीनगर येथे असून ऑफीस मध्ये यातील आराेपी मुकुल याने त्याच्या बिटकाॅईन विक्री करणारे कंपनीचे प्रतिनिधी म्हणून सुजाॅय पाॅल (रा.पुणे), मंगेश कदम (रा,पुणे) यांना पाठवले. सदर ठिकाणी बिटकाॅईनचे व्यवहारात मुकुल याचे सांगण्यावरुन त्यांनी मिटिंग घेऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तक्रारदार यांना प्रथम तीन बीटकाॅईन देताे असे सांगुन आराेपी शब्बीर शेख याने साथीदार रंजित जरनैल सिंह याचे बँक खात्यावर 19 लाख 70 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. परंतु त्यावेळी बीटकाॅईन दिले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी पैसे परत करण्याची मागणी केली असता, आराेपीनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली.

पोलिसांनी सदर गुन्हयाचा तपास करत प्रियेश राव, रंजिन सिंह (37,रा.मीरा भाईंदर,ठाणे), शब्बीर शेख (41,रा.मीरा राेड,मुंबई), सुजाॅय पाॅल (रा.हांडेवाडी,पुणे) व मंगेश कदम (रा.गाेखलेनगर,पुणे) याचेवर गुन्हा दाखल केला. सदर गुन्हयात मुकुल हा बिटकाॅईन विक्री करण्याच्या व्यवहारात प्रमुख सुत्रधार असून ताे नाव व माेबाईल बदलून तसेच राहण्याचे ठिकाण वेळाेवेळी बदलून राहत हाेता. सदर आराेपीचा काेणत्याही प्रकारचा सुगावा नसताना, आराेपीस पोलिस अंमलदार आदेश चलवादी यांनी तांत्रिक मदतीच्या आधारे आराेपीचे छायाचित्र प्राप्त करुन व आराेगीचा सुगावा लागल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली.

त्यानुसार पोलिसांचे एक पथक कर्जत येथे जाऊन त्यांनी आराेपीचा शाेध घेऊन त्यास जेरबंद केले आहे. सदरचा गुन्हा मार्च 2022 मध्ये दाखल झाला हाेता तेव्हापासून पोलिस प्रमुख सुत्रधाराचा माग काढत हाेते. सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलिस उपायुक्त परिमंडळ एक संदीप सिंह गिल्ल, सपाेआ सतिश गाेवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वपाेनि अरविंद माने, पाेनि विक्रम गाैड, सायबर पथकाचे सपाेनि बाजीराव नाईक, पोलिस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, अर्जुन कुडाळकर, रुचीका जमदाडे यांचे पथकाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...