आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागृहोपयोगी वस्तू खरेदी विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर सोफा विक्रीची जाहिरात देणे पुण्यातील एका तक्ररदाराला चांगलेच महागात पडले आहे. सोफा खरेदीच्या बहाण्याने सायबर चोरट्याने तक्रारदाराच्या बँक खात्यातून तब्बल 5 लाख 6 हजार रुपये ऑनलाईनरित्या परस्पर वर्ग करून फसवणूक केली. याप्रकरणी संबंधिताने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीवर आर्थिक फसवणूक आणि आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.
तक्रारदार हे खासगी कंपनीत काम करत असून बाणेर रस्ता भागात राहायला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी नवीन सोफा घेण्यासाठी घरातील जुन्या सोफा विक्रीची ऑनलाईनरित्या जाहिरात दिली होती. त्यानुसार चोरट्याने त्यांना संपर्क साधला आणि त्यांना सोफा आवडला असून मला सोफा खरेदी करावयाचे असल्याचे सांगितले.त्यानंतर सोफा खरेदीचा बहाणा करून तडजोडीअंती व्यवहार ७० हजार रुपयांमध्ये ठरला होता. त्यानंतर चोरट्याने त्यांना क्युआर कोड पाठवून त्यांच्या मोबाईलवर स्कॅन करण्यास सांगितला. तक्रारदार यांनी कोड स्कॅन केल्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्यातून परस्पर ५ लाख ६ हजार ६०० रुपये अनोळखी आरोपीने वर्ग करून घेतल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी याबाबत पोलिसांकडे धाव घेत अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक डी.गायकवाड पुढील तपास करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.