आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आरोग्योत्सव:पुण्यात गणेश मंडळाकडून कोविड केंद्राची सुरुवात करून यावर्षी गणेशसेवा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मानाच्या पाच गणपती मंडळांनी एकत्रित येऊन पुणे मनपाच्या सहकार्याने कोविड केअर केंद्राची सुविधा केली

समाजावर आलेल्या कोविड संकटाचे विघ्न दूर करण्याकरिता पुण्यातील मानाच्या अष्टविनायक गणपती मंडळांनी कोविड मुक्ती केंद्र उभारून सेवा उत्सव करण्याचा निर्धार केला आहे. या अष्टविनायक गणपती मंडळांनी एकत्रितपणे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील कोविड मुक्ती केंद्राची जबाबदारी घेतली असून एकाच वेळी सुमारे ४०० रुग्णांची सोय या केंद्रामध्ये केली जाणार आहे.

मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती हे पुण्यनगरीचे मानाचे अष्टविनायक गणपती मंडळ एकत्रित येऊन पुणे मनपाच्या सहकार्याने कोविड केअर केंद्राची सुविधा केली आहे. याबाबत माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेला पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, श्री गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, केसरी वाडा गणपतीचे अनिल सपकाळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, पुनीत बालन, नितीन पंडित, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

फर्ग्युसन महाविद्यालय वसतिगृहातील कोविड मुक्ती केंद्रामध्ये ४०० रुग्णांकरिता आवश्यक बेड व त्यामध्ये २० आॅक्सिजन बेडचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यंत आध्यात्मिक वातावरणात शरीराच्या प्रतिकारशक्तीबरोबरच मानसिक क्षमता वाढीवर येथे भर देण्यात येणार आहे.