आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडूशेठ बाप्पाला निरोप:भक्तांनी केला काळजाचा ढोल, श्वासाच्या झांजा; पुण्यात तब्बल 22 तासांपेक्षा जास्त वेळ चालली मिरवणूक

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचे ‘मोरया, मोरया’च्या गजरात विसर्जन झाले. पांचाळेश्वर घाटावर गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम हौदात बाप्पाचे विसर्जन पार पडले. तब्बल दोन वर्षांनी सार्वजनिक जाणेशोत्सव साजरा होत असल्याने, भक्तमंध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची भव्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात आलो होती. यावेळी हजारो भक्तांनी गर्दी केली. विसर्जन मिरवणुकीवेळी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये जमले होते. पुण्यात 23 तासाहून अधिक काळ ही विसर्जन मिरवणूक सुरू होती. मोत्याच्या दिव्यांनी उजळून निघालेल्या रथातून मिरवणूक सोहळा निघाला होता.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती हे लाखो भाविकाचे श्रद्धास्थान आहे. गणेशोत्सव काळात दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते. श्रीमंत असला तरीही तितकाच दानशूर म्हणूनही हा गणपती ओळखला जातो. अनेक सामाजिक संस्था आणि लोकांच्या मदतीसाठी खंबीरपणे उभे राहणारे मंडळ म्हणून दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ओळखले जाते.

बातम्या आणखी आहेत...