आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेराेना संकट:पुण्यात देखाव्याविना गणेशाेत्सव, यावर्षी शहरात गणेश मंडळांना पोलिसांनी परवानगी नाकारली

पुणे3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यातील गणेशोत्सव यंदा प्रथमच देखाव्याविना पार पाडला जाणार

पुण्यातील गणेशोत्सवाची आेढ ही राज्यभरातील भाविकांसाेबतच जगातील पर्यटकांसाठी दरवर्षी आकर्षण असते. मात्र, काेराेनाच्या संकटामुळे पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांनी यंदा गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारचे देखावे सादर करण्यास पाेलिसांनी परवानगी नाकारली असल्याने पुण्यातील गणेशोत्सव यंदा प्रथमच देखाव्याविना पार पाडला जाणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमूर्तीची स्थापना यंदा मंडळाच्या नियमित मंडपातच करावी असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

आगामी गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने मनपा सभागृहात आढावा बैठक गुरुवारी आयाेजित करण्यात आली हाेती. यावेळी पाेलिस सहआयुक्त शिसवे म्हणाले, काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने ती आटाेक्यात आणण्याचे दृष्टीने प्रयत्न केले गेले पाहिजेत. गणेशाेत्सव काळात गर्दी हाेऊ नये याकरिता मिरवणुकांना बंदी घालण्यात आलेली आहे. काेराेनाचे संकट लक्षात घेता मंडळांनी यंदा गणेश मंडळाचे मंडपातच मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करावी. दहा दिवस त्याचठिकाणी पूजा करुन मूर्तीचे साध्या पध्दतीने विसर्जन करावे, असे पोलिस सहआयुक्तांनी सांगितले.