आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा परिणाम:पुण्यात मंडप न उभारता गणेशोत्सव साजरा करणार, प्रमुख 50 गणेश मंडळांचा संकल्प

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मूळ मंदिरातच छोट्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून यंदा उत्सव साजरा केला जाईल

गणेशभक्तांचे लक्ष आकर्षून घेणारे भव्य देखावे, रंगांची उधळण करणारी विद्युत रोषणाई, वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित कल्पक देखावे...अशी परंपरा जोपासणाऱ्या पुण्यातील प्रमुख ५० गणेश मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यंदाच्या गणेशोत्सवात मंडप न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ मंदिरातच छोट्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून यंदा उत्सव साजरा केला जाईल, असे या मंडळांनी कळवले आहे.

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी व गणेशभक्तांची गर्दी टाळण्याच्या उद्देशातून यंदा मंडप उभारणी न करता गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. मंडळाच्या गणेश मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येईल. भाविकांना ऑनलाइन दर्शनाची सुविधा देण्यात येणार आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या ध्यानात घेता यंदा प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणूक रद्द करून गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी यापूर्वीच घेतला आहे. अखिल मंडई मंडळाने यंदा प्रथमच मंडळाच्या समाज मंदिरामध्ये शारदा-गजाननाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये यंदा मंडप न उभारता मंदिरामध्येच गणरायाची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले होते.

कोरोनााच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा बाबू गेनू मंडळ, हत्ती गणपती मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ या प्रमुख मंडळांसह शहराच्या विविध भागातील ५० गणेश मंडळांनी हुतात्मा बाबू गेनू मंडळाच्या मंदिरामध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेत सामाजिक भान राखणारी भूमिका घेतली आहे. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे या निवेदनाची प्रत सुपूर्द करण्यात आली.

असा होईल गणेशोत्सव

मंडळातर्फे वर्षभर ज्या छोट्या शेडमध्ये मूर्ती ठेवण्यात येतात त्याच ठिकाणी छोट्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. मंडळाचे पाच कार्यकर्ते दररोज पूजाअर्चा, आरती आणि धार्मिक विधी करतील. गणेशभक्तांसाठी इंटरनेटचा वापर करून यंदाचा गणेशोत्सव ऑनलाइन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...