आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सराईत गुंडाचे खून प्रकरण:दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या रागातून हत्या; महिलेसह तिघे अटकेत

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील नाना पेठ भागात राजेवाडी येथे एका सराईत गुन्हेगार तरुणाने दारु पिऊन शिवीगाळ केल्याच्या रागातून त्याचा एका टाेळक्याने खून केल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी समर्थ पाेलिसांनी एका महिलेसह तीन आराेपींना अटक केली असून आणखी तीन आराेपींचा पाेलिस शाेध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक रमेश साठे यांनी दिली आहे.

राेहन रविंद्र पवार (वय-24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर यापूर्वी मारामरीचे चार गुन्हे दाखल हाेते. याप्रकरणी पोलिसांनी उषा कुचेकर (वय-44), आदित्य केंजळे (25) व राजन ऊर्फ राेहित काऊंटर (23, सर्व रा.नाना पेठ,पुणे) यांना अटक केली आहे. सुशांत कुचेकर, तेजस जावळे व आतिश ऊर्फ प्रकाश फाळके या तीन आराेपींचा पाेलिस शाेध घेत आहे. याबाबत आराेपी विराेधात पाेलिसांकडे रविंद्र ऊर्फ माऊली श्रावण पवार (वय-56,रा.नाना पेठ,पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

तक्रारदार रविंद्र पवार यांचा मुलगा राेहन पवार यास मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आराेपी राजन काऊंटर याने राहत्या घरातून बाेलवून घेतले. त्यानंतर बुधवारी रात्री सव्वा बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास दारु पिऊन शिवीगाळ केल्याच्या जुन्या भांडणाच्या कारणावरुन राजेवाडी, नाना पेठ पुणे येथील रस्त्यावर व गल्लीत राेहनला सुशांत कुचेकर याने त्याच्याकडील काेयत्याने राेहनच्या अंगावर व हातावर वार केले. आराेपी तेसज जावळे याने त्याच्याकडील चाकुने अंगावर व ताेंडावर वार केले. तर आराेपी राजन काऊंटर, आदित्य कांजळे व उषा कुचेकर यांनी त्याच्यावर अंगावर व ताेंडावर विटांनी मारहाण करुन त्याला गंभीर जखमी करत जीवे ठार मारुन सदर भागातील लाेकांना घाबरवून दहशत निर्माण केली आहे. याप्रकरणी पुढील तपास समर्थ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमाेद वाघमारे करत आहे.

समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे म्हणाले की, सदर खुनाच्या घटनेतील मयत राेहन पवार आणि आराेपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यात पूर्ववैमनस्य हाेते. उषा कुचेकर व तिचा मुलगा हे आराेपी ही सराईत गुन्हेगार आहे. दारु पिऊन मयताने पूर्वी आराेपींना शिवीगाळ केली हाेती, त्या रागातून आराेपींनी खुनाचा प्रकार केला आहे. सदर गुन्हयात तीन आराेपी फरार असून त्यांचा पोलिस शाेध घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...