आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Ganpati Utsav Pune Mumbai High Court Disicion Update | The Court Rejected The Plea To Take Out The Earlier Procession Of Lord Ganesha

वादावर हायकोर्टाने टाकला पडदा:मानाच्या गणपतींची आधी मिरवणूक काढण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातल्या गणपती विसर्जन मिरवणुकीचा वादावर मुंबई उच्च न्यायालयाने पडदा टाकला आहे. कोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका ही फेटाळल्यात आली आहे.

पुण्यात मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक झाल्यानंतर अन्य मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी देण्याच्या परंपरेला 'बढाई समाज ट्रस्ट'चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालायात आव्हान दिले होते. मात्र, त्यांची याचिका फेटाळण्यात आल्याने आता पुण्यातील गणेश मिरवणूक ही परंपरेनुसार पार पडणार आहे.

पुण्यातील गणेश मिरवणुकीवरून वाद सुरू आहे. सुरुवातीला पाच मानाचे गणपती हे विसर्जनासाठी जात असतात. त्यानंतर इतर गणेश मंडळे ही मिरवणुकीसाठी येत असतात. यात मोठा वेळ जात असल्याने इतर गणेश मंडळाना ताटकळत थांबावे लागत असल्याने, 'बढाई समाज ट्रस्ट'चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालायात याचिका दाखल केली होती.

याचिकाकर्त्यास फटकारले

गणपती विसर्जनाबाबतची याचिका मिरवणूक याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. विसर्जन तोंडावर असताना स्वैर याचिका करणे चुकीचे असल्याचे सांगत कोर्टाने याचिका करणाऱ्याला फटकारले आहे. पुण्याच्या गणपती महोत्सवातील विसर्जन मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी 1894 मध्ये आधी विसर्जन कोणी करायचे यावरून प्रश उपस्थित केल्याने वाद झाला होता.

परंपरा आजही सुरू

पुण्याचे ग्रामदैवत म्हणून विसर्जनाचा पहिला मान कसबा गणपतीला, पुण्याची ग्रामदेवता म्हणून दुसरा मान तांबडी जोगेश्वरीला राहील असे टिळकांनी त्यावेळी ठरवले होते. काही दिवसानंतर तिसरा मान गुरुजी तालीम, चौथा मान तुळशीबाग आणि पाचवा मान केसरीवाडा या मंडळाला मिळाला. तेव्हापासून पुण्यातील पहिले पाच मानाचे गणपती हे विसजर्न करत असतात. ही परंपरा आजही सुरू आहे. मात्र, या मानाच्या गणपती विसर्जनाला बराच उशीर होतो.

न्यायालयात याचिका

मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्याशिवाय इतरांना विसर्जन करण्याची परवानगी नसल्याने मंडळांना रांगेत तासंतास ताटकळत बसावे लागते. यामुळे, पुण्यात मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक झाल्यानंतर अन्य मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी देण्याच्या परंपरे विरोधात बढाई समाज ट्रस्ट'चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

वादावर पडदा

पुण्यातील गणेश विसर्जनाची ही परंपरा संविधानातील कलम 19 नुसार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे, असा दावा त्यांनी केला होता. मानाच्या गणपतीआधी छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची परवानगी त्यांनी मागितली होती. मात्र, त्यांची याचिका ही हायकोर्टाने फेटाळली. याचिका फेटाळल्याने तूर्तास या वादावर पडदा पडला.

बातम्या आणखी आहेत...