आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यावतीने यंदा गणेशोत्सवानिमित्त पंचकेदार मंदिर साकारण्यात येणार आहे. मंदिराच्या प्रतिकृतीत दगडूशेठ गणपती विराजमान होणार आहे. सजावटीचा शुभारंभ सोहळा सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथे शिल्पकार विवेक खटावकर व वैशाली खटावकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
असे साकारणार मंदिर
देशातील पाच शिव मंदिरांचा समूह पंचकेदार मंदिर या नावाने प्रसिध्द आहे. ही पाच शिव मंदिरे उत्तराखंड मधील गढवाल येथे आहे. केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि काल्पेश्वर या नावांनी हि मंदिरे प्रसिद्ध आहेत. पंचकेदार मंदिर हे या मंदिर समूहाची कलात्मक पुर्नरचना असणार आहे. गंगा, यमुनोत्री, भागीरथी, गंगा तसेच शिवाच्या अष्टमूर्तींचे प्रतिक असलेले गर्भगृह आणि प्रत्यक्ष शिवाचे वाहन नंदीचे शिल्प, अनेक देवतांच्या प्रतिकृती या मंदिरात उभारण्यात येतील. पंचकेदार मंदिर म्हणजे तीर्थ स्थळातील प्रमुख असलेल्या चारधाम यात्रेचे एक प्रमुख मंदिर असून त्या मंदिरसमूहाचे दुर्लभ दर्शन गणेशोत्सवात घडणार आहे.
81 फूट उंच
पंचकेदार मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १०० फूट लांब, ५० फूट रंद आणि ८१ फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. सजावट विभागात ४० कारागिर दिवस-रात्र कार्यरत राहणार आहे. त्यानंतर राजस्थानमधील कारागिर रंगकाम करणार आहेत. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना लांबूनदेखील सहजतेने दर्शन घेणे शक्य होणार आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.
श्रीमंतांच्या चरणी मनोहर प्रतिकृती
केदार हे नाव प्रत्यक्ष शंकराचे असून केदारनाथाचे मंदिर देशातील १२ ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक आहे. हे शिव स्थान हिंदू धर्मातील तीर्थस्थळांमध्ये छोटा चारधाम या नावाने देखील महत्वाचे आहे. हिमालयातील पाच शिवमंदिरांचे क्षेत्र केदारक्षेत्र किंवा केदारखंड या नावानेदेखील ओळखले जाते. अशा या पाच मंदिर समूहांचा म्हणजे पंचकेदार मंदिराची अत्यंत मनोहारी प्रतिकृती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी याव समर्पित करण्यात येत आहे.
----
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.