आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:पुणे येथे गोळ्या झाडून कचरावेचक तरुणाचा खून

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भल्या सकाळी एका कचरावेचक तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्या हत्येचे कारण अस्पष्ट असून हल्लेखोर पसार झाले आहेत. दुचाकीवरील दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर दोन गोळ्या झाडत त्याची हत्या केली. अक्षय प्रकाश भिसे (२५, रा. पठारे वस्ती) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अक्षयच्या नातेवाइकांनी तक्रार दिली आहे.

अक्षय हा कचरावेचक होता. तो दररोज सकाळी कचरा गोळा करण्यास जात असे. रविवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास तो घरातून कचरा गोळा करण्यासाठी निघाला होता. पायी चालत तो दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागील एकनाथ पठारे वस्तीतून जात होता. त्यादरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी येथील गल्लीत अक्षयला गाठले. तसेच त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्याने अक्षय रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. लागलीच नागरिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...