आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अन्नापूर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला शिरूर पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आयोजकांसह गौतमी पाटीलवर आली असल्याचे सांगण्यात येत आहे आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ऐनवेळी गौतमी पाटील ऐवजी तिची सहकारी हिंदवी पाटील हिचा नृत्य कार्यक्रम आयोजित केला. यावेळी गौतमी पाटील हिने या नृत्य कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रेक्षकांची जाहीर दिलगिरी व्यक्त केली आणि पुढच्या महिन्यात कार्यक्रम घेईल असेही स्पष्ट केले.
पुढील महिन्यात अन्नापूर येथे हनुमान जयंती निमित्त गौतमी पाटील च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आयोजकांवर आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम रद्द करण्याची आयोजकांवर वेळ आली.
अन्नापूर हे शिरूर तालुक्यातील महत्वाचे गाव आहे. या गावाला तमाशा होण्याची परंपरा आहे. मात्र, तमाशाच्या कार्यक्रमात अनेकदा भांडण, राडे होत असतात. आतापर्यंत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली.
पर्याय म्हणून गौतमी पाटीलची सहकरी हिंदवी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करावे लागले. यावेळी कार्यक्रमस्थळी गौतमी पाटील उपस्थित होती. कार्यक्रमाला येऊनही तिने सादरीकरण केले नाही. हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे.
गौतमी पाटील हिने यावेळी कार्यक्रम स्थळी हजेरी लावून प्रेक्षकांशी संवाद साधला. गौतमीने काही कारणांमुळे सादरीकरण करता येत नसल्याने दिलगिरी व्यक्त केली. अन्नापूरची मुलगी म्हणून इथे आले असून मी काही कारणामुळे कार्यक्रम करू शकत नाही, मात्र पुढच्या वेळी नक्की मी नृत्य करेल असे आश्वासन गौतमी पाटील हिने प्रेक्षकांना दिले.
गौतमी पाटील हिने काही दिवसांपूर्वी कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तीन गाण्यांना तीन लाख रुपये घेत नसल्याचे तिने स्पष्ट केले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.