आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून तो इंस्टाग्रामवर व्हायरल केल्या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे सखोल तपास करून दोघांना ताब्यात घेतले. त्यात एक अल्पवयीन असून विशेष म्हणजे गौतमी पाटील हिचे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करणात आले होते, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी आयुष अमृत कणसे( वय- २१, रा. भरतगाववाडी, ता. सातारा) तसेच एक विधीसंघर्षग्रस्त बालक,(वय १७ वर्षे ) याला विमानतळ पोलीस स्टेशनकडील तपासी अधिकारी यांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर बदनामी केल्याने गौतमी पाटील हीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आलेली होती. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी विमानतळ पोलिस स्टेशन येथे विनयभंग आणि आयटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रसिद्ध नृ्त्यांगणा गौतमी पाटील ही शांत, संयमी व्यक्तिमत्व असून तिच्या नृत्याने महाराष्ट्रातील तमाम रसिकांना भुरळ घातली आहे. परंतु, हा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर ज्यांनी हा केला त्यांच्यावर सर्व थरातून टीकाही करण्यात आली होती.
हि कारवाई पोलिसआयुक्त रितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-४ शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलिस आयुक्त, येरवडा विभाग किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याच्या तपास अधिकारी पोलिस निरीक्षक, गुन्हे संगिता माळी, सहा. पोलिस फौजदार, अविनाश शेवाळे, पोलीस अमलदार, किरण खुडे, रेहान पठाण, अंकुश जोगदंड, दादासाहेब बर्डे, महिला पोलिस अंमलदार,आस्मा शेख, रेणुका भोगावडे, प्रियंका शिंदे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक, गुन्हे, संगीता माळी या करीत आहेत.
यावर काय म्हणाल्या होत्या चाकणकर?
गौतमी पाटील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी सायबर सेलला महिला आयोगाकडून सूचना देण्यात आली. अशाप्रकारे महिलेचे चित्रीकरण करणे अत्यंत चुकीचे आहे.अशा पद्धतीने व्हिडिओ करण्याचा कुणालाही अधिकार नाही. असे महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी म्हटले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.