आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Gave A Cigarette On The Wife's Cheek And Locked Her In The House While Pronouncing Talaq Three Times, 15 Days Incident Revealed, Case Registered

पत्नीच्या गालावर पतीने दिले सिगारेटचे चटके:3 वेळा तलाक उच्चारत घरात कोंडूले, 15 दिवसांपूर्वीचा प्रकार उघड, गुन्हा दाखल

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीचा शारिरीक छळ करून तिला सिगारेटचे चटक दिले, त्यानंतर पतीने तीनवेळा तलाक म्हणत घरात कोंडून ठेवले. ही घटना 21 ऑक्टोबरला लोहगावमध्ये घडली आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

महिलेची तक्रार

याप्रकरणी फारूख शेख ( वय 31), शकशावली शेख, नुरजहा शेख, शब्बीर शेख, आयेशा शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

एकवर्षांपूर्वी झाले लग्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे आणि फारूखचे नोव्हेंबर 2021 मध्ये लग्न झाले आहे. तेव्हापासून फारूख आणि त्याच्या कुटूंबियांनी महिलेचा शारिरीक व मानसिक छळ केला. तिचा गळा दाबून मारहाण करीत खुनाचा प्रयत्न केला. त्याशिवाय गालावर सिगारेटचे चटके देऊन 3 वेळा तलाक म्हटले. त्याने पत्नीला घरात कोंडून कुलूप लावले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एन शिळमकर तपास करीत आहेत.

गाई म्हशींच्या दुध वाढीसाठी शक्कल, पाच जणांवर गुन्हा

गाई, म्हशींच्या दुधवाढीसाठी अपायकारक औषधांचा साठा करून विक्री करणाऱ्या पाचजणांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. ही घटना 5 नोव्हेंबरला कलवड वस्ती परिसरात उघडकीस आली अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली.

समीर कुरेशी (वय 29), विश्वजीत जाना, मंगल गिरी (वय 27), सत्यजीत मोन्डल, श्रीमंता हल्दर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बाबुभाई उर्फ अल्लाउद्दीन याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी तक्रार दिली आहे.

आरोपींकडे कोणताही औषध आणि सौदर्यप्रसादने विक्रीचा परवाना नसतानाही, त्यांनी ऑक्सीटोसीनचा साठा केला. संबंधित औषध गाई म्हशींच्या दुधवाढीसाठी वापरण्यात येते. मात्र, त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होउन श्रवण कमजोरी, पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. असे असतानाही, आरोपींनी अपायकारक औषधांचा साठा केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...