आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासहकार आणि लेखा विषयात पदविका (जी.डी.सी.अँड ए.) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा 2022 चा निकाल जाहीर करण्यात आला असून फेरगुण मोजणीकरीता https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.
परीक्षार्थींना हा निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन व पासवर्डचा उपयोग करुन पाहता येईल. तसेच https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील महत्वाचे दुवे मधील 'जी.डी.सी. अँड ए. मंडळ' या टॅबवर थेट पाहता येणार आहे.
फेरगुणमोजणीचे शुल्क भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी 75 रुपये अधिक बँक शुल्क याप्रमाणे चलनाद्वारे भरावे. बँकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करून घेण्याची मुदत त्याच दिवशी रात्री 10.30 पर्यंत राहणार आहे. चलन बँकेत 3 जानेवारी 2023 (बँकेचे कामकाजाचे वेळेत) पर्यंत भरणा करण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर विचार करण्यात येणार नाही, असेही जी.डी.सी. ॲण्ड ए बोर्डच्या सचिवांनी कळविले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा दिली; तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील असे राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांच्या आदेशानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.