आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंपनानेच शेत खाल्ले!:'घोडावत रिटेल'च्या खाद्यपदार्थाची चोरी, बिझनेस हेडने कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन 30 लाखांना गंडवले

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घोडावत रिटेल मध्ये बिझनेस हेड म्हणून कामास असलेल्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांशी संगणमत करून, घोडावत रिटेलचा खाद्यतेल व तांदूळ मालाची परस्पर चोरी करून त्याची बेकायदेशीर विक्री करून एकूण 30 लाख सहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरवारी दिली आहे.

विकास श्रीवास्तव, ज्ञानमूर्ती झा, राजेशकुमार अविनाश झा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी घोडावत रिटेलचे मॅनेजर सुदर्शन कुमार पाटील ( वय -40, राहणार - जयसिंगपूर, कोल्हापूर) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

हा प्रकार 9/8/ 2019 ते 23 /7/ 2022 यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,तक्रारदार सुदर्शन पाटील हे घोडावत रिटेल या कंपनीत कामास आहेत .घोडावत रिटेल या ऑफिसमध्ये यापूर्वी कार्यरत असणारे तत्कालीन बिजनेस हेड विकास श्रीवास्तव यांनी संबंधित कालावधी दरम्यान, फर्मच्या इतर कामगारांच्या मदतीने संगनमत करून फर्मचे खाद्यतेल व तांदूळ मालाची परस्पर चोरी केली.

त्यानंतर सदर मालाची बेकायदेशीररित्या विक्री करून त्यातून मिळालेल्या 30 लाख सहा हजार रुपयांचे स्वतःचे आर्थिक फायदा करता वापर करून, विश्वासाने आर्थिक फसवणूक केल्याने संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस सावंत पुढील तपास करत आहे.