आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंच्‍या टीकेला गिरीश महाजन यांचे प्रत्युत्तर:अस्वस्थ उद्धव ठाकरेंची शेवटची धडपड

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे यांच्याकडे आता काही उरलेले नाही. ते अस्वस्थ आहेत. मेळाव्यातून प्रक्षोभक भाषण करून ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यांची ही शेवटची धडपड असून त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, अशा शब्दांत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. चिंचवडमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सरपंचांच्या राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी ते आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जाईल. राज्यात काही महिन्यांपूर्वी अडथळे होते. मात्र, आता केंद्रात व राज्यात दोन्हीकडे आमचेच डबल इंजिनचे सरकार आहे, असे महाजन यांनी सांगितले.

पद्मश्री पोपटराव पवारांना ऑफर : गावासाठी चांगले काम करत राहाल, तर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, आमदार व खासदारही होता येते. आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार चांगले काम करतात. ते विधानसभेतही असतील. परंतु, ते आमच्या पक्षाकडूनच असतील, असे म्हणत महाजन यांनी त्यांना ऑफर दिली.

बातम्या आणखी आहेत...