आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांच्या घरचे घबाड:दुसऱ्याचा घरी जाऊन मी पैशावर नाव लिहू शकत नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी मिळालेल्या पैशावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पैसै कुणाच्या घरी मिळाले? माझ्या घरी तर पैसे मिळाले नाही ना असा टोला लगावताना दुसऱ्याचा घरी जाऊन मी पैशावर नाव लिहू शकत नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहे.

पुण्यातील विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री विजय शिवतारे, युवा सेनेचे किरण साळी उपस्थित होते.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करणार

आम्ही सध्या खूप काम करतो आणि जनेतच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे. लवकरच मंत्री मंडळ विस्तार ही करण्यात येईल. आम्ही जी भूमिका घेतली त्याचे स्वागत जनतेने केले असून ते आम्हाला समर्थन देत आहे. लोकशाहीत सर्वजण आपआपले काम करत आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्रकार परिषदेत लगावला आहे.

शिंदे म्हणाले,अतिवृष्टी मुळे जी जीवित आणि वित्त हानी झाली आहे तसेच पीक नुकसान झाले याबाबत माहिती घेण्यात आली आहे. पीक कर्ज वाटप, धारण पाणीसाठा, पंतप्रधान आवास योजना, कोविड आढावा आणि लसीकरण माहिती याबाबत सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली आहे. तीर्थक्षेत्र विकास, केंद्र आणि राज्य विकास योजना, रस्ते निर्मिती,रस्ते दुरस्ती, रिंग रोड आदीबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडे जे प्रलंबित विषय आहे त्याचा आढावा घेऊन यादी तयार करण्यास सांगितले आहे.

प्रलंबित कामांना गती देणार

पुणे विभागातील पाच जिल्ह्यात जी कामे प्रलंबित आहे त्यांना गती देण्याचे काम करण्यात येईल. फाईल प्रवास रेंगाळत न होता तातडीने झाला पाहिजे आणि लोकांना वेळेत काम पूर्णे करून देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे. अतिवृष्टी असताना मी आणि उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोलीत प्रवास करून लोकांना भेटून पूर परिस्थिती आढावा घेतला आहे. खराब हवामानामुळे विमान प्रवास करू शकत नव्हतो तरी कारने प्रवास करून आम्ही शेतकरी बांधावर पोहचलो. शेतकऱ्यांना पंचनामे पूर्ण झाल्यावर आवश्यक ती मदत देण्यात येईल.

माझ्या नावाने काही करू नये

पुढे ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज समाधी विकास आराखडा यास कोणती ही स्थगिती देण्यात आलेली नाही ते काम यापुढे पूर्ण करण्यात येईल. पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या नावाने उद्यान उभारले त्याबाबत ते म्हणाले,प्रेमापोटी कोणी काही करत असेल तर त्याबाबत मी काही करू शकत नाही. आनंद दिघेंच्या नावाने ते उद्यान असल्याची मला माहिती असून माझ्या नावाने काही करू नये असे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...