आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:मानाच्या मंडई गणपती मंदिरात चोरी, 20-22 तोळ्यांचे दोन हार आणि दानपेटीतील रोकड लंपास

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे

पुण्यातील मानाच्या अखिल मंडई गणपती मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडलीस आली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या लोखंडी दरवाजाची कडी उचकटून मूर्तीवरील 20-22 तोळ्यांचे दोन सोन्याचे हार आणि दानपेटीतील रोकडही लंपास केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. दरम्यान, ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंडईचा गणपतीच्या मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या दरवाजाची कडी उचकटून चोरटा आतमध्ये शिरला. गणपतीच्या मूर्तीवरील दोन हार चोरले. तसेच जाताना मंदिरासमोरील दानपेटी फोडली. मंदिराचे पुजारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मंदिरात आल्यानंतर हा चोरीचा प्रकार समोर आला. त्यानी तात्काळ मंडळाच्या पदाधिकारी यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी पोलिसांना कळविले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser