आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार हिसका!:सुटे पैसे देण्याच्या नादात सराफाने गमावले 2 लाख रुपये! डाॅक्टरचा मुलगा असल्याचे सांगत पैशांची बॅग घेवून पसार

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''मी डॉक्टर असून मला पेशंटला द्यायला सुटे पैसे नाही, मला सोन्याचे बांगड्यांचेही माप द्यायचे आहे म्हणून एका ठिकाणी सराफाच्या व्यवस्थापकाला बोलवून घेतले. दरम्यान महिला डॉक्टरचा मुलगा असल्याचे भासवून पेशंटला पैसे देण्याच्या बहाण्याने पैशाची बॅग घेऊन भामटा पसार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी डॉ. कुलकर्णी महिलेसह तिच्या साथीदारावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओमप्रकाश शामसुंदर वैष्णव (32, रा. ओम निलकंठेश्वर बिल्डींग, वाघोली मुळ रा. राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी वाघोली येथील गिरीराज ज्वेलर्स या सराफी दुकानात गेली 20 वर्षापासून नोकरीस आहेत. ते सध्या येथे व्यवस्थापक आहेत. 9 मे रोजी दुकानावर असताना त्यांना डॉ. कुलकर्णी नामक महिलेचा फोन आला. त्यांनी दुकानातून बांगड्या बनविण्याची इच्छा असल्याचे सांगितले. परंतु, तिच्याकडे 2 हजारांच्या नोटा तसेच चार लाख रूपये असल्याचे तिने सांगितले. तसेच ओमप्रकाश यांच्याकडे 2 लाख रूपये सुटे आहेत का ? अशी विचारणा करून सुटे पैसे घेऊन येण्यास सांगितले.

तिने सांगितल्याने सुटे पैसे घेऊन ओमप्रकाश केअर हॉस्पीटल येथे गेले. तेथे गेल्यावर महिलेला फोन केल्यानंतर तुम्हाला घ्यायला मुलाला पाठवते म्हणाल्यानंतर तिने एकाला गेटवर पाठवले. पहिल्या मजल्यावर ओमप्रकाश यांना नेल्यानंतर त्यांना महिला राहत असलेला फ्लॅट दाखवला. अन् याचवेळी सुटे पैसे पेशंटला द्यायचे आहे असे सांगून त्या संशयित पैशाची बॅग घेऊन तो खाली गेला. फ्लॅटमध्ये ओमप्रकाश यांनी जाऊन पाहिले तर फ्लॅटमध्ये कोणतीच महिला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

मुलाला खाली जाऊन पहिले तर तो देखील तेथे नसल्याचे व पैसेही लंपास झाल्याचे ओमप्रकाश यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली आहे. तपास लोणीकंद पोलिस करत आहे.