आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोल्डन मास्क:पुण्यातील गोल्डन मॅनने तयार केला चक्क 2.90 लाखांचा सोन्याचा मास्क

पुणे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात आतापर्यंत 30 हजारांवर कोरोना रुग्ण झाले आहेत, तर एक हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमिवर शहरात बाहेर फिरताना मास्क घालणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, पुण्यातील एका व्यक्तीने सर्वांचे लक्ष आकर्षित केले आहे. पुण्यात गोल्डमॅन नावाने प्रसिद्ध शंकर कुराडे यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी चक्क सोन्याचा मास्क बनवला आहे.

सोन्याची आवड असलेले शंकर आपल्या शरीरावर 3 किलो सोने घालून फिरतात. यांच्या गळ्यात सोन्याची मोठी साखळी, हातांच्या सर्व बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या आणि हातात सोन्याचे मोठे ब्रेसलेट आहे.

2.90 लाख रुपयात तयार झाले मास्क

शंकर यांनी हे सोन्याचे मास्क बनवण्यासाठी 2.90 लाख रुपयांचा खर्च केला आहे. हे मास्क साडेपाच तोळ्यांचे आहे. श्वास घेण्यासाठी मास्कमध्ये लहान छिद्रदेखील देण्यात आले आहे. शंकर यांनी सांगितले की, कोरोनापासून वाचण्यासाठी हा मास्क पूर्णपणे सुरक्षित आहे.

अशी सुचली कल्पना

शंकर यांना लहानपणापासूनच सोन्याची आवड आहे. शंकर यांनी सांगितले की,"मी कोल्हापूरच्या एका व्यक्तीला चांदीचा मास्क तयार केल्याचे टीव्हीवर पाहिले, त्यानंतर सोन्याचे मास्त बनवण्याची कल्पना सुचली." यानंतर शंकर यांनी सोनाराकडून एका आठवड्यात हे सोन्याचे मास्क बनवून घेतले. 

कुटुंबियांसाठी तयार करणार असे मास्क

शंकर यांनी पुढे सांगितले की, "माझ्या कुटुंबातील व्यक्तींनाही सोन्याची आवड आहे. त्यांनाही असे मास्क हवे असल्या, त्यांच्यासाठीही मास्क तयार करेल. या सोन्याच्या मास्कमुळे कोरोना माझ्या जवळ येईल का नाही, हे माहित नाही. पण, सोशल डिस्टंसिंगचे पालन केल्यावर कोरोनापासून नक्की बचाव करता येईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser