आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादागिने बनविण्यासाठी सराफाकडून सोने ताब्यात घेत दोघे कामगार २२ लाख ८० हजारांचे दागिने घेऊन पसार झाले आहेत. ही घटना ३ एप्रिलला रविवार पेठेत घडली असून फरासखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ५७ वर्षीय सराफाने तक्रार दिली आहे.
फिर्यादी हे सराफी व्यावसायिक असून रविवार पेठेत त्यांचे सोने-चांदीचे दागिने बनविण्याचे दुकान आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार ते दागिने बनविण्यसाठी दोघा कारागिरांकडे देत होते. मागील अनेक महिन्यांपासून त्याचा कामगारांवर विश्वास होता. त्यामुळे त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने बनविले जात होते.
३ एप्रिलला फिर्यादीने दोघा कामगारांकडे २२ लाख ८० हजारांचे सोने कारागिरांच्या ताब्यात दिले. मात्र, एक महिन्यानंतरही त्यांनी दागिने न दिल्यामुळे सराफाला संशय आला. चौकशी केली असता, दोघेही कारागिर पसार झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे पुढील तपास करीत आहेत.
पुणे स्टेशन परिसरात तरुणाला लुटले, ५० हजारांची सोनसाखळी चोरली
पुणे स्टेशन परिसरात लुटमारीचे सत्र कायम कायम असून दुचाकीस्वार चोरट्यांनी रूग्णालय परिसरात बसलेल्या तरुणाला मारहाण करीत त्याच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना ६ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास जहाँगीर रुग्णालयासमोरील रस्त्यावर घडली.
शिवम शर्मा (वय २६ रा. वडगाव शेरी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम हा कामानिमित्त पुणे स्टेशन परिसरात आला होता. कंटाळा आल्यामुळे तो ६ मे रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास रूग्णालय परिसरात बसला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्याला दमदाटी केली. शिवीगाळ करीत त्याच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.