आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''हिंदुत्वाच्या बुरख्याआड ‘बजरंग बली’चे नावे घेऊन कर्नाटकात मते मागणारे मोदी सरकार दुसरीकडे मात्र, ‘बजरंगाची उपासना करणाऱ्या महीला मल्लांवरील रावणी अत्याचारींना वाचवते. हीच भाजपची खरी ओळख आहे अशी घणाघाती टीका काॅंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. ते आज पुण्यात बोलत होते.
राष्ट्रपती मुर्मू शांत का?
तिवारी म्हणाले, देशाच्या राष्ट्रपती पदावर आदिवासी महीला राष्ट्रपती विराजमान असुनही, राजधानी दिल्ली मध्ये जंतर-मंतरवर भारतास ॲालिम्पीकमध्ये पदके मिळवून राष्ट्राचे नाव ऊंचावणाऱ्या, राष्ट्रीय महीला कुस्तीगीर खेळाडूंच्या प्रश्नावर देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या शांत का आहेत?
काय म्हणाले तिवारी?
तिवारी म्हणाले, ''भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक छळ प्रकरणी दिर्घकाळ सत्त्याग्रह करावा लागतो आहे. या महीला खेळाडुंचे रस्त्यावरील ‘सत्त्याग्रह आंदोलनाचे’ कव्हरेज व त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी तेथे गेलेल्या महीला पत्रकार साक्षी जोशी यांना दिल्ली पोलीसांनी दिलेली वागणूक निषेधार्थ व निंदनीय होती. देशाच्या राजधानीत चाललेला हा प्रकार महीला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कशा खपवून घेत आहेत..?''
पत्रकारच सुरक्षित नसतील तर..
तिवारी म्हणाले, स्वातंत्र्योत्तर लोकशाही रुपी भारताच्या संविधानामुळे देशाची महीला भगीनी राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या आहेत. मात्र त्यांचे दृष्टीपथातच ‘महीला खेळाडूंना न्यायासाठी अविरत संघर्ष करावा लागत असेल व महीला पत्रकारच् जर सुरक्षीत नसतील’ तर महीला राष्ट्रपतींकडुन देशवासियांनी काय अपेक्षा करावी..?असा प्रश्न आहे.
राजीव गांधींची आठवण..
तिवारी म्हणाले, राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३% आरक्षण देऊन महीलांच्या सबलीकरणा करीता पावले उचलली होती. महिला सुरक्षा जबाबदारी घेणाऱ्या मोदी - शहांच्या सरकारला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी जाणीव करून देण्याची वेळ आली आहे.
आत्मचिंतनाची वेळ
तिवारी म्हणाले, राजमाता जिजाऊ, झाँसीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकरांचा वारसा असलेल्या भारतात, महीलांवरील अत्याचार जर “महीला राष्ट्रपती” असतांना देखील घडत असतील तर राष्ट्रपतींना पदावर राहण्याबाबत नैतिक अधिकार आहे काय? याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.