आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीचंद​​​​​​​ पडळकरांचे भाऊ ब्रह्मानंदांना तहसीलदारांचा झटका:मिरजच्या वादग्रस्त जागेवर मिळकतधारकांचा दावा मान्य

मिरज8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिरजेतील वादग्रस्त जागेवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांना तहसीलदारांनी मोठा झटका दिला आहे. वादग्रस्त ठरलेल्या जागेप्रकरणी मिरज तालुका न्यायदंडाधिकारी दगडू कुंभार यांनी निकाल देताना मिळकतदारांचा कब्जा तात्पुरता मान्य केला आहे. तसेच ब्रह्मानंद पडळकर यांना गरज वाटत असेल, तर योग्य त्या ठिकाणी दाद मागण्यास सांगितले आहे.

आठ दुकाने पाडली होती

पाडापाडी झालेल्या ठिकाणा लावण्यात आलेले कलम 145 हेही तालुका न्याय दंडाधिकारी यांनी हटवले आहे. 6 जानेवारी रोजी रातोरात जेसीबी लावून पडळकर यांनी 8 मिळकत धारकांची आठ दुकाने पाडली होती.

ताबा मिळवण्यासाठी पाऊल

गोपीचंद पडळकरांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी जागेचा ताबा मिळवण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील जवळपास आठ मिळकती रात्रीतून जमीनदोस्त केल्या होत्या. 4 जेसीबी आणि हजारोंचा जमाव घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल, दुकान, मेडिकल, पान शॉप असे आठ बांधकाम जमीनदोस्त केल्याचा आरोप मिळकतधारकांचा आहे. या प्रकरणी मिरज पोलिस ठाण्यात गुन्हाही मिळकतधारकांनी दाखल केला होता. त्यानंतर जागेच्या मालकीचा वाद पुढे आला होता.

काय आहे प्रकरण?

मिरज शहरी बसस्थानकाजवळ मुख्य रस्त्यावर काही दुकाने, हॉटेल, औषध दुकान गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ आहेत. ही जागा पडळकर यांनी विकत घेतली असल्याचा दावा केला जात आहे. या दुकानांना जागा खुली करण्याचे प्रयत्न सुरू होते. यातून गेले काही दिवस हा वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अचानक चार जेसीबी आणून या जागेत कार्यरत असलेली दहा दुकाने पाडण्यात आली होती. या जेसीबी अडविण्याचा प्रयत्नही जमावाने रोखला. या प्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...