आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंकेतील नेत्यांप्रमाणे पवार पळ काढतील:पडळकरांची टीका; सीतारामन कधी बारामतीचे ऑपरेशन करतील समजणारही नाही

बारामती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

2024 ला पवारांचे विसर्जन करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 3 दिवसीय बारामती दौऱ्यावर आहेत, असे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

जसे श्रीलंकेतील नेत्यांवर असलेल्या जनतेच्या रोषातून त्यांना देशातून पळून जावे लागले, तसेच पवारांना बारामतीमधून पळून जावे लागेल, असा हल्लाबोल पडळकर यांनी केला.

काय म्हणाले पडळकर?

पडळकर म्हणाले की, बारामतीकरांना एखाद्याला फसवून, लुबाडून घेण्यात फार आनंद असतो​. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा सुप्रिया सुळे वरमाई सारखं महाराष्ट्रभर फिरत होत्या. मात्र, निर्मला सीतारामन या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. त्या कधी बारामतीचे ऑपरेशन करतील समजणारही नाही, असे म्हणत त्यांनी पवारांसह खासदार सुप्रिया सुळेंना इशारा दिला.

पवारांच्या सोबत कुणी नाही

पडळकर म्हणाले की, बारामती हा काही पवारांचा बालेकिल्ला नाही. ही केवळ एक टेकडी आहे. ती मी फिरून ठोकत आहे. मात्र, पोलिसांच्या सहाय्याने पवारांचे राजकारण सुरू आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असे म्हणत पडळकरांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

हे पवारांचे दुःख

अजित पवारांनी बंड केले तेव्हा दोन तृतीयांश आमदार त्यांच्या मागे राहिले नाहीत. एकनाथ शिंदे 50 आमदार घेऊन गेले. फडणवीस यांना यांना सत्तेत बसू द्यायचे नव्हते. तरीदेखील ते सत्तेत आले, हे शरद पवारांचे दुःख असल्याचे पडळकर यांनी म्हटले.

हा भाजपचे विजय

शरद पवारांना भारताने पाकिस्तान विरोधात मॅच जिंकल्यावर हात वर करावा लागतानाचा व्हिडिओ पोस्ट करावा लागतोय. तर कधी आरती करत असतानाचा हा खरा भाजपचा विजय असल्याची खोचक टीकाही पडळकरांनी पवारांवर केली. आजच्या मेळाव्यातील गर्दी पाहून पवारांना अस्वस्थ वाटू लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

रूपाली ठोंबरेंना प्रत्युत्तर

ज्यांना स्वत: ला उमेदवारी मिळाली नाही तो व्यक्ती बारामती जिंकणार, अशी टीका रूपाली ठोबरेंनी केली होती. यावर बोलताना भाजपमध्ये काम करणाऱ्या लोकांचा सन्मान होतो, असे सांगतानाच ज्यांना उमेदवारी नाकारली होती, तेच आता 288 मतदारसंघात तिकीट वाटप करणार आहेत, असा टोला त्यांनी रूपाली ठोबरेंना लगावला.

बातम्या आणखी आहेत...