आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नवनीत राणांना सुनावले:पोलिसांचा राग येत असेल, तर संरक्षण का घेता?, पोलिस स्थानकात केलेले वर्तन योग्य नाही

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिसांवर तुमचा राग असेल. तर पोलिसांकडून सुरक्षा का घेता. केंद्रात, राज्‍यात तुमचे सरकार आहे.पोलिसांची सुरक्षा काढून का टाकत नाही, असा सवाल करीत पोलिसांच्‍या कुटुंबियांनी खासदार नवनीत राणा यांच्‍यावर कारवाई व्‍हावी, अशी मागणी केली आहे.

त्यावर अमक्याला निलंबित करू तमक्याला निलंबित करू असे म्हणणे योग्य नाही.नवनीत राणा यांनी पोलिस स्टेशनमध्ये केलेले वर्तन योग्य नाही. अशी प्रतिक्रिया विधानसभेच्या उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली आहे.

नीलम गोऱ्हे यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे एका भाजप नेते गणेश बिडकर त्यांच्या फार्म हाऊसवर एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिचे आई वडील घरी नसताना विशाल गायकवाड याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी या मुलीच्या आईच्या तक्रारीवरून ताब्यात घेतले आहे. त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, या आरोपीवर योग्य ती कलमे लावून कठोर कारवाई करण्याच्या सूचना आज मी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना दिल्या आहेत. असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

राज्यातील आदिवासींच्या विकासासाठी

विशेष प्रयत्न करण्याच्या राज्य सरकारला सूचना

नाशिक आणि अहमदनगर भागातील आदिवासी पालकांनी आपल्या पोटाच्या मुलांना पैशाच्या गरजेपोटी विकल्याची धक्कादायक बातमी नुकतीच काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची त्वरीत दखल घेऊन डॉ. नीलम गोर्‍हे यांनी अशा प्रकारच्या घटना घडवून आणणारे कोणी समाजकंटक नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहेत की काय याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मी केली आहे.

अशा प्रकारच्या घटना आदिवासी भागात पुन्हा पुन्हा घडू नयेत यासाठी आदिवासी कुटुंबांना शाश्वत स्वरूपाचा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी गांभीर्याने प्रयत्न आदिवासी विकास विभागाने करावा अशी सूचना यावेळी त्यांनी केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार केली आहे. याबाबत तातडीने दखल घेऊन मी या शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. लम्पी स्कीन आजाराबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आणि भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. डॉ. गोऱ्हे यांच्याकडे राज्यातील अनेक भागातील शेतकरी याबाबत दूरध्वनीवरून विचारणा करीत आहेत. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना याबाबत त्वरित दिलासा मिळावा यासाठी मी पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त आयुक्त सचेंद्र प्रताप सिंग यांच्याशी चर्चा केली.असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

याबाबतची आवश्यक त्या सूचना आणि माहिती शेतकऱ्यांना, सर्व परिसरातील गावांना याबाबत माहिती उपलब्ध व्हावी अशी सूचना यावेळी करण्यात आली आहे. गावपातळीवर उपचार आणि लसीकरण देण्याबाबतची सूचना यंत्रणेला देण्यात यावी असे निर्देश पशू संवर्धन विभागाचे आयुक्त सचेंद्र प्रताप सिंग यांना मी आज दिले.

बातम्या आणखी आहेत...