आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Gosavi Trapped By Taking Selfie With Aryan:Private Detective’ And NCB’s ‘independent Witness’ Also A Wanted Accused In 2018 Cheating Case In Pune

आर्यनसोबत सेल्फी घेऊन अडकला गोसावी:पोलिस रेकॉर्डमध्ये वॉन्टेड किरणवर मलेशियात नोकरी देण्याच्या नावावर लाखोंच्या फसवणुकीचा आरोप; आता अटकेची टांगती तलवार

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मलेशिया पाठवण्याच्या नावावर 3 लाखांच्या फसवणुकीचा आरोप

किरण गोसावी नावाचा माणूस मुंबई ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत सेल्फी घेऊन वादात सापडला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी गोसावी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर पुण्यात नोंदवलेल्या एका प्रकरणात गोसावी 3 वर्षांपासून वॉन्टेड असल्याचे समोर आल्याने नवा वाद सुरू झाला आहे. गोसावीचा फोटो समोर आल्यानंतर आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने नवाब मलिक आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन काही नवीन खुलासे करू शकतात.

मलेशिया पाठवण्याच्या नावावर 3 लाखांच्या फसवणुकीचा आरोप
क्रॉसवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) केलेल्या कारवाईत साक्षीदार म्हणून सामील असलेल्या किरण गोसावीवर 2018 मध्ये पुण्यात कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाला मलेशियात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने गोसावीवर तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. चिन्मय यांनी सांगितले की त्यांना मलेशियाला पाठवण्यात आले होते, पण तिथे पोहोचल्यावर त्यांना समजले की त्याला फसवण्यात आले आहे.

पैसे मागितले म्हणून जीवे मारण्याची दिली होती धमकी
चिन्मय देशमुख यांनी सांगितले की, काही दिवस मलेशियात राहिल्यानंतर ते कसे तरी मलेशियातून पुण्यात परतण्यास यशस्वी झाले, पण परत आल्यानंतर, जेव्हा त्यांनी किरण गोसावीकडे पैशांची मागणी केली, तेव्हा किरणने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर चिन्मय यांनी किरणवर गुन्हा दाखल केला, पण तेव्हापासून तो फरार होता. आता किरण गोसावी शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबत सेल्फी काढून पोलिसांच्या नजरेत आला आहे.

गोसावीवर 2007 पासून 2008 पर्यंत फसवणुकीची चार प्रकरणे दाखल

पोलिस स्टेशनया कलमांखाली गुन्हे दाखल
कापुरबावड़ी पोलिस स्टेशन, ठाणेIPC 160, 420 आणि 34
कापुरबावड़ी पोलिस स्टेशन, ठाणेIPC 164, 420 आणि 34
अंधेरी पोलिस स्टेशनIPC 408, 419, 420, 201 आणि 34
फारासखाना पोलिस स्टेशन, पुणेIPC 105, 419 आणि 420

राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा हल्ला
क्रूझवरील छाप्यात एका भाजप नेत्याचा आणि एका वॉन्टेड गुन्हेगाराचा समावेश करण्याविषयी आता काँग्रेसने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) विरोधात मोर्चाही उघडला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, 'जहाजावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या एनसीबी टीमने जाणूनबुजून कायद्याचे उल्लंघन केले आहे. दुसरीकडे, एनसीबीने बुधवारी स्पष्टीकरण दिले होते की छापामध्ये सहभागी असलेले दोन बाहेरचे लोक मनीष भानुशाली आणि केपी गोसावी हे स्वतंत्र पंच म्हणून टीमसोबत जहाजावर गेले होते.

आर्यन खानसह 8 जणांना न्यायालयीन कोठडी
मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने गुरुवारी आर्यन खानसह आठ आरोपींना क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर. एम.नेलींकर यांनी कोठडी वाढवण्याची एनसीबीची मागणी फेटाळली. न्यायालयाने म्हटले, 'एनसीबीला आर्यन आणि इतर सात आरोपींची कस्टडीअल चौकशी करण्याची भरपूर संधी देण्यात आली होती. आता कस्टोडियल चौकशीची गरज नाही. यानंतर आर्यन आणि इतर आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. यावर आज सुनावणी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...