आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसींचा तुटवडा:सरकारी लसीकरण केंद्रे बंद, पुण्यात खासगी रुग्णालयांबाहेर लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा; 100 ते 200 जणांचे मोफत व्हॅक्सीनेशन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लता मंगेशकर यांनी ट्विट करून 100 ते 200 जणांना मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले आहे.

महापालिकेचे लसीकरण केंद्र बंद असल्याने आज पुणेकरांची पावलं खासगी रुग्णालयाकडे लस घेण्यासाठी वळाली. त्यासाठी पुण्याच्या विविध भागांतून नागरिकांनी विविध खाजगी रुग्णालयांबाहेर गर्दी केली होती. नागरिकांनी खासगी लसीकरण केंद्राबाहेर लांबलचक रांगा लावल्या आहेत. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्राबाहेर सकाळपासूनच नागरिकांची लस घेण्यासाठी जवळपास दीड किलोमीटरपर्यत रांगा लावल्या.

दरम्यान लता मंगेशकर यांनी ट्विट करून 100 ते 200 जणांना मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले आहे. कोणत्याही कागदपत्रांशिवाय हे लसीकरण मोफत करण्यात येईल त्यामुळे देखील गर्दी वाढली आहे. शहरात लसीची उपलब्धता होत नसल्याने शहरात दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनाच लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता लसच उपलब्ध नसल्याने नागरिक लसीकरण केंद्रावर जाऊन हवालदिल होऊन परतत आहेत.

लसीच्या तुटवड्यामुळे महापालिकेची लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची सूचना कालच पुणेकरांना देण्यात आली होती. त्यामुळे पुणेकर नागरिकांनी आपला मोर्चा खाजगी रुग्णालयाकडे वळवला. आज अगदी सकाळी विविध रुग्णालयांबाहेर पुणेकरांनी लसीकरणासारी मोठी गर्दी केली होती.

महापौर मोहोळ काय म्हणाले?
लसीच्या तुटवड्यावर बोलताना महापौर मोहोळ म्हणाले, 'लसींचा पुरवठा न झाल्याने मंगळवार दि. 25 मे रोजी पुणे मनपा हद्दीतील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. मनपास लस प्राप्त झाल्यावर पुढील लसीकरणाचे नियोजन जाहीर केले जाईल, पुणेकर नागरिकांनी याची नोंद घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...