आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तासंघर्षाचा परिणाम:राज्यातील महापालिका निवडणुका सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता ?

मंगेश फल्ले | पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सुरू असलेल्या सत्ता समिकरणांच्या परिणामातून राज्यात पुन्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास ओबीसी आरक्षणाचा तोडगा काढण्यासह, भाजपकडून प्राधान्याने 14 महापालिकांसाठी निश्‍चित करण्यात आलेली तसेच भाजपला अडचणीची ठरलेली तीन सदस्यांची प्रभाग रचना बदलली जाण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे, या दोन्ही प्रक्रियेसाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाऊन महापालिकांच्या निवडणूका जानेवारी- फेब्रुवारी 2023 पर्यंत पुढे जाऊ शकतात, असा अंदाज महालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

सत्तेचा मार्ग सुकर

प्रभाग रचना पुन्हा चारची केल्यास त्याच थेट फटका महाविकास आघाडीला बसणार असून भाजपचा महापालिकेतील सत्तेचा मार्ग सुकर होऊ शकतो, याच कारणातून आगामी काळात आणखी राजकीय खलबतं घडण्याची शक्‍यता आहे. भारतीय जनता पक्ष चार सदस्यांचा प्रभाग अनुकूल असल्याने मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार सदस्यीय प्रभाग रचना महानगरपालिका निवडणुकीत अमलात आणली होती. निवडणुकांच्या निकालानंतर त्याचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे यावेळीही महानगरपालिका निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग असावा याकरीता भाजप प्रयत्नशील होता.

समीकरण बदलण्याची चिन्हे

महाविकास आघाडी सरकारकडून तीन सदस्यीय प्रभाग रचना करत भाजपला शहर देण्यात आला होता. मात्र, सध्या राज्यातील सत्ता समीकरण बदलण्याची चिन्हे निर्माण झाल्याने राज्यातील सप्टेंबर- ऑक्टोबर महिना मध्ये प्रस्तावित असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका सहा महिन्यांपर्यंत लांबणीवर पडू शकतात असा अंदाज महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...