आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:भटक्या-विमुक्तांच्या सदनिकेत शासन, सभासदांची 200 कोटींची फसवणूक, 396 सदनिकांपैकी 218 सदनिकांची केली समाजाबाहेर विक्री

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारजे माळवाडी येथे शासनाने भटक्या व विमुक्त समाजासाठी साडेचार एकर जागा राखीव ठेवली होती. त्या ठिकाणी बिल्डरच्या मदतीने ३९६ सदनिका बांधण्यात आल्या. त्यापैकी २१८ जणांकडून रकमा घेऊनही त्यांना सदनिका न देता त्यांची परस्पर विक्री करत गैरव्यवहार करणाऱ्या अध्यक्षासह दोघांवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक अशोक वेताळ (४०, रा. गंधर्वनगरी, बिल्डिंग मोशी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अंबादास दत्तात्रय गोटे (७०, आशीर्वाद गार्डन सोसायटी, शिवणे, पुणे. मूळ पत्ता रा. जोशीवाडी, तहसीलदार कचेरी शेजारी, पो. घोडनदी, ता. शिरूर, जि.पुणे) आणि गणेश बजरंग माने (४२ वर्षे, रा.जोशीवाडी, शिरूर, जि. पुणे) व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९९० ते मार्च २०२२ दरम्यान वारजे माळवाडी येथील स.न ३५/२ रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीत हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर सहकारी गृहरचना संस्थेचे अध्यक्ष अंबादास गोटे, सचिव गणेश माने व इतरांनी सोसायटीचे मूळ २१८ सभासदांना शासनाकडून मिळणाऱ्या जागेवर घरे बांधून देतो असे सांगत फिर्यादी व इतर सभासदांकडून सन १९९० पासून आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे रोख रकमा स्वीकारल्या. समाजासाठी शासनाकडून १ हेक्टर ७६ आर जमीन प्राप्त करून त्यावर ३९६ फ्लॅट्स बांधून ते रामनगर सोसायटीच्या मूळ २१८ सभासदांना न देता, आर्थिक लाभांकरिता इतर लोकांना शासनाच्या परवानगी शिवाय विक्री केली. सोसायटीचे मूळ सभासद व शासनाची अंदाजे २०० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. अंबादास गोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शासनास व न्यायालयास वेळोवेळी खोटी महिती सादर करून त्यांची दिशाभूल केली. केवळ दहाच सदनिका समाजातील नागरिकांना दिल्या; गुन्हा दाखल

एका बिल्डरला सदनिका बांधण्याचे काम दिले होते. त्याने शासनाने सांगितलेल्या नागरिकांना त्या देणे अपेक्षीत होते. परंतु शासनाची कोणतीही परवानगी न घेता ३९६ सदनिका बांधल्या. त्यातील केवळ १० भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना दिल्या. उरलेल्या सदस्यांना सदनिका न देता त्याची परस्पर विक्री केली. नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...