आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२० वा पदवी प्रदान समारंभ १२ मे रोजी होणार आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे पदवी प्रदान कार्यक्रम झाला नव्हता. यंदा ताे होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या समारंभात ७५ विद्यार्थ्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे (नॅक) अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक व अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे यांनी ही माहिती दिली. पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, पीएचडी, एमफिल स्तरावरील एकूण १ लाख १८,२२२ विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे प्रमाणपत्रे पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये ३०९ पीएचडीधारक आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.