आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे जिल्ह्यातील 19 ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान व मतमोजणी शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सार्वत्रिक मतदान असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मतदानाच्या दिवशी 4 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते मतमोजणीचा दिवशी 5 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या परीघापासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकांचा समावेश असलेल्या कार्यक्षेत्रात मतदान व मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्राच्या व मतमोजणी केद्रांच्या परीघापासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरातील टपऱ्या, स्टॉल, दुकाने, वाणिज्यिक आस्थापना व तत्सम बाबी बंद ठेवाव्यात. आदेशाचा उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम 188 मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शस्त्रे जमा करण्याबाबत आदेश
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 6 पोलिस स्थानक हद्दीतील एकूण 29 शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्रे संबंधित पोलिस स्थानकाला जमा करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
उल्लंघन झाल्यास कारवाई
शस्त्रपरवाना धारकांनी आदेश प्राप्त होताच ताबडतोब व कोणत्याही परिस्थितीत सात दिवसाच्या आत शस्त्र जमा करावीत. बारामती तालुका पोलिस स्थानक हद्दीतील 9, वाचलंदनगर पोलिस स्थानक हद्दीतील 3, इंदापूर पोलिस स्थानक हद्दीतील1, शिरुर पोलिस स्थानक हद्दीतील 11, हवेली पोलिस स्थानक हद्दीतील 5 असे 29 शस्त्रपरवाना धारकांकडील शस्त्र जमा करुन घेण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे. शस्त्र जमा करताना शस्त्रे ज्या स्थितीत होती त्या स्थितीतच धारकास जमा कालावधीनंतर परत केली जातील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम 188 मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.