आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपला कुठलाही देव आणि महापुरुष बॅचलर नाही अशाप्रकारचे नवे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यात आयोजित राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर राषट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या शैलीत टीका केली आहे. आव्हाड म्हणाले, एकही देव बॅचलर नाही म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांची भेट मारूतीराया घेणार आहे. आणि दादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत कि नाही ह्यावर सविस्तर चर्चा करणार आहेत, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
सध्या राज्यात नवनवीन वाद निर्माण होताना दिसून येत आहे. महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्यांची रांग लागलेली असताना आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी नवे विधान केल्याने ते वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि जितेंद्र आव्हाड यांनी या वादात उडी घेतल्याने नक्कीच हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपला कुठलाही देव बॅचलर नाहीत. आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाहीत. संसार करुन सगळे करता येते. सेवा देखील करता येते. जगात असा कोणताही माणूस नाही ज्याचे रक्त हिरवे किंवा निळे आहे. देवाने किंवा परमेश्वराने कुठलाच भेद केला नाही. त्यांनी सर्वांना समान पाठवले आहे. सगळ्यांना दोन डोळे दोन कान आणि समान शरीर देवाने दिले आहे. माणसाचा जन्म हा स्पर्मपासून होतो. स्पर्म कुणाला दिसत नाही तो स्पर्म 100 किलोचा माणूस तयार करतो. तो माणूस कसा आहे हे ठरवतो. त्या स्पर्ममधून माणूस निर्माण करणारा कुणीतरी आहे ना? सगळी माणसे त्याने बनवली आहेत.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
आपला एकही देव बॅचलर नाही असे चंद्रकांत दादांनी म्हणताच इंद्रलोकात भुवया उंचावल्या व सगळयांनी मारुतीकडे बघायला सुरुवात केली. व मारुतीला चंद्रकांत दादांचे म्हणणे ऐकवले. मारूतीने निर्णय घेतला आहे, की लवकरच चंद्रकांत दादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत कि नाही ह्यावर सविस्तर चर्चा करणार. संसार करून पण सगळे करता येते अस महापुरुष व देवांना उद्देशून चंद्रकांत दादांनी म्हटले आहे. त्यावर आता रामदास स्वामी काय उत्तर देतात ह्यावर आता सगळ्यांच्या नजारा लागल्या आहेत. असे खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.