आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउंड्री येथील रहिवासी प्रकल्पासाठी पर्यावरण तसेच इतर कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकता हाउसिंग प्रा. लि. कंपनीला राष्ट्रीय हरित लवादाने १५ कोटी ९९ लाख ०९ हजार ३७५ रुपयांचा दंड ठोठावला. पर्यावरण पूर्ववत करेपर्यंत बांधकाम बंद ठेवण्याचे आदेशही लवादाने दिले आहेत.
एकता हाउसिंग प्रा. लि. यांचा महानगरपालिका हद्दीतील उंड्री गावामध्ये एकता कॅलिफोर्निया नावाचा रहिवासी प्रकल्प आहे. त्यासाठी त्यांनी २००७ मध्ये पुणे महापालिकेकडून पहिली परवानगी मिळवली. दरम्यान, कंपनीने प्रकल्प रचनेत ७ वेळा बदल करत प्रकल्पाची कक्षा वाढवून ४४८४१.४१ चौ.मी. पेक्षा जास्तीचे बांधकाम केले. बांधकामाचे क्षेत्रफळ २० हजार चौरस मीटरपेक्षा जास्त असताना पर्यावरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असतानादेखील ती घेतली नाही. पर्यावरण कार्यकर्ते तानाजी गंभिरे यांनी अॅड. नितीन लोणकर. सोनाली सूर्यवंशी यांच्यामार्फत हरित लवादात धाव घेत ऑगस्ट २०१९ मध्ये प्रकरण दाखल केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.