आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Greetings Freedom Fighters Students Jai Ganesh Vidyarthi Parenthood Yojana | Information About 75 Freedom Fighters Through Plaques

जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेच्या विद्यार्थ्यांकडून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन:75 स्वातंत्र्यसेनानींची फलकांद्वारे माहिती

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक, मंगल पांडे, शहीद बाबू गेनू यांसह सरदार उधमसिंग, शिरीषकुमार मेहेता, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी अशा भारतीय स्वातंत्र्याकरिता योगदान देणाऱ्या 75 सुपरिचित व अपरिचित स्वातंत्र्यसेनानींची फलकांद्वारे माहिती देत त्यांना दगडूशेठ गणपती मंदिरासमोर रविवारी अभिवादन करण्यात आले.

जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेच्या संस्कार वर्गातील 250 विद्यार्थ्यांच्या भारत माता की जय... च्या जयघोषाने मंदिरासमोरील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या परिसर दुमदुमून गेला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश पालकत्व योजनेतील 250 विद्यार्थ्यांनी 75 स्वातंत्र्यसेनानींची फलकांद्वारे माहिती दिली.

अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रम

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर विद्यार्थ्यांनी हे 75 फलक हातात घेऊन स्वातंत्र्यसेनानींना मानवंदना दिली. जय गणेश पालकत्व योजनेच्या संस्कारवर्गातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. स्वातंत्र्यसेनानींची छायाचित्रे, माहिती असे फलक विद्यार्थ्यांनी तयार केले होते. आजच्या पिढीला या क्रांतिवीरांची माहिती व्हावी, यादृष्टीने हा उपक्रम घेण्यात आला.

व्यवसायात यशाचं शिखर गाठावे

केवळ घरात बसून एक गृहिणी न रहाता आपली आवड , कला गुण यांना वाव देऊन महिलांनी उद्योग व्यवसायात येऊन यशाचे शिखर गाठावे असे मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केले . महिलांनी पुण्यातील डेक्कन येथे सुरू केलेल्या गरिमा या पारंपरिक व आधुनिक अशा वस्त्र दालनाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

पुढे त्या म्हणाल्या की, पुण्यातील संस्कृती आणि इतिहास याला साजेसे असे हे वस्त्रदालन आहे. आता गौरी, गणपती सह अनेक सण सुरू होत आहेत. त्यासाठी हे दालन पुणेकर महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी ब्रिंदा जोशी-दवे, चेतना काळे, वर्षा सेरवाणी, प्रशांत दवे यासह पुण्यातील सामाजिक व उद्योग क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...