आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनामुळे रेड लाइट एरियातील मोठ्या बदलांची कहानी:पुण्याच्या बुधवार पेठमध्ये टेम्परेचर चेकींग, मास्क, ग्लोव्स, सॅनिटायझर आवश्यक, अनेक ग्राहकांना घातली जातेय अंघोळ

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • लॉकडाऊन सुरू होताच बुधवार पेठला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आणि रेड लाइट एरियात जाणारा प्रत्येक रस्ता ब्लॉक करण्यात आला, पोलिस 24 तास येथे तैनात राहत असतं
 • अनलॉक-1 नंतर येथे नियमांसह देह व्यापार सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली, 5 पॉझिटिव्ह केस आल्यानंतर जुलैमध्ये हे 15 दिवसांसाठी बंद ठेवावे लागले

एक लाख ऐंशी हजारांपेक्षा जास्त रुग्णांसह पुणे देशातील सर्वात जास्त कोरोना संक्रमितांचे शहर बनले आहे. बाकी जगभरातील लोकांप्रमाणेच महामारीनेही येथे राहणाऱ्यांची लाइफस्टाइल बदलली आहे. शहरातील जुनी रौनक ही जवळपास गायब झाली आहे. देशातील तिसऱ्या सर्वात मोठ्या रेड लाइट एरिया म्हणजेच बुधवार पेठमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी येथील प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि सेक्स वर्कल महिलांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. लॉकाडऊन झाल्यानंतर 4 महिन्यांपर्यंत येथे एकही केस आढळली नाही. पण आता केस समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत 40 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. दिलासादायक म्हणजे आता केवळ 15 अॅक्टिव्ह केस समोर आल्या आहेत. सुदैवाने अद्याप येथे एकाचाही मृत्यू झालेला नाही.

लॉकडाऊन सुरू होताच काय केले?
पेठचे प्रभाग अधिकारी सचिन तामखेडे म्हणतात की, 'लॉकडाऊन होताच हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. रेड लाइट क्षेत्राकडे जाणारा प्रत्येक रस्ता ब्लॉक करण्यात आला. येथे पोलिसांचे पथक चोवीस तास तैनात होते. येथे होणारा वेश्याव्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यासोबतच घरोघर स्वच्छताही करण्यात आली. येथे राहणाऱ्या बर्‍याच महिला आणि त्यांच्या कुटुंबाची स्क्रिनिंग केली गेली. त्यांच्यात काही लक्षणे आढळल्यास त्यांना औषधे दिली गेली. येथून घरी जाऊ इच्छित असलेल्या महिलांना घेऊन येण्याची व्यवस्था करण्यात आली.' मार्चपासून सुरू झालेली ही प्रक्रिया आतापर्यंत सुरू आहे.

परिसरातील गर्दी पाहता रहिवाशांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पालिकेची टीम या भागात छापा टाकते आणि मास्क न घालता फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करते. परिणामी, गर्दीचे क्षेत्र असूनही आतापर्यंत येथे खूप कमी प्रकरणे आढळली आहेत.

अनलॉक -1 नंतर फक्त येथे नियमांसह देह व्यापार पुन्हा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, 5 पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ते 15 दिवस बंद ठेवावे लागले. आता परिस्थिती सामान्य झाली आहे. येथे कार्यरत असलेल्या 'सहेली संघ' च्या तेजस्वी सेवेकारी यांच्या सर्वेक्षणानुसार, बहुतेक सेक्स वर्कर कामावर परतल्या आहेत. एनजीओने पालिकेच्या अधिकार्‍यांसह मिळून एक विशेष एसओपी तयार केला आहे. जास्तीत जास्त काळजी घेण्यासाठी त्यांना व्हिडिओ-ऑडिओ क्लिपद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे.

तेजस्वी म्हणतात, 'आम्ही बर्‍याच वर्षांपासून इथे कार्यरत आहोत, पण अशी समस्या कधी पाहिलीच नाही. राज्यातील पहिले प्रकरण पुण्यातच आले. माहिती मिळताच आम्ही महिलांना कोरोनाविषयी सतर्क केले. त्या म्हणतात की, येथे सुमारे 2500 नोंदणीकृत सेक्स वर्कर आहेत. सुरुवातीला त्यांना समजावने थोडे अवघड होते, परंतु शहरात ही प्रकरणे जसजशी वाढत गेली तसतसे महिला स्वत: पुढे आल्या आणि ग्राहकांना नकार देऊ लागल्या. जवळपास 4-5 दिवसात हा भाग सील करण्यात आला आणि कंटेन्मेंट झोन नसतानाही संपूर्ण लॉकडाऊनमध्ये सुमारे 100 दिवस हा भाग सील करण्यात आला'

सेक्स वर्कर म्हणाल्या - भुकेने मरण्याची वेळ आली
तेजस्वी सेवाकारी म्हणतात की, 'जेव्हा या महिलांवर भुकेने मरण्याची वेळ आली तेव्हा यांना संक्रमणापासून बचावासाठी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून 'फोन सेक्स'चा पर्यायही उपलब्ध करण्यात आला. या गूगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून पैसे घेत आहेत.' बुधवार पेठेत 7 वर्षांपासून सेक्स वर्करम्हणून काम करणाऱ्या सुप्रिया (नाव बदलेले) म्हणतात, 'अशी परेशानी आम्ही नोटबंदीच्या वेळीही पाहिली नव्हती. आमचा परिसरही सील होता. आम्ही घरात बंद होतो. बाहेर सामना घेण्यासाठीही जाऊ दिले जात नव्हते. कमाईचे संपूर्ण सोर्स बंद झाले होते. आम्हीही ठरवले होते की, आम्ही स्वतःच्या खातर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणार नाही.'

पडताळणीमध्ये या सर्व गोष्टी आणि दावे सत्य निघाले

 • या अनेक दाव्यानंतर आम्ही एका सामाजिक कार्यकर्त्यांसोबत मिळून या परिसराची तपासणी केली. त्यांना ग्राहक बनवून एक ब्रोथलवर पाठवले. ते मध्ये जाताच त्यांना मास्क आणि हँड क्लोव्स घालण्यास सांगितले.
 • ब्रोथलवर जाताच त्यांना हातात दंडा घेऊन बसलेल्या ब्रोथल (कोठा)ची संचालिकाने त्यांना अडवले. खोलीत जाण्यापूर्वी रेट ठरवण्यात आले आणि त्यांच्याकडून अडवान्स पैसे घेण्यात आले. संचालिकेने त्यांचे हात सॅनिटाइज करुन घेतले आणि त्यांना पर्स आणि मोबाईल बाहेर जमा करण्यास सांगितले.

यानंतर त्यांनी तेथील एका महिलेला निवडले आणि त्यांना घेऊन एका खोलीत जाऊ लागले. तेव्हा महिलेने त्यांना एका बाथरुममध्ये अंघोळीस जाण्यास सांगितले. यावेळी महिलांनी मास्क किंवा कपड्याने चेहरा झाकलेला आहे.

पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे व्हायरस येथे पसरु शकले नाही. येथे 4-5 संस्थांनी मिळून राशन वाटले आणि भाज्या आणि फळं देण्याचे काम केले. ज्यांची तब्येत खराब होती त्यांना वेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते केल्या 6 महिन्यापासून सातत्याने सर्वांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.

सेक्स वर्करसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी)

 • येथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला स्क्रीनिंग आवश्यक
 • ग्राहकांना नेहमी मास्क घालायचा आहे
 • येथे काम करणाऱ्यांचे रुटीन हेल्थ चेकअप करुन घेणे अनिवार्य
 • निगमच्या डॉक्टरांना आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांन सातत्याने बोलावले जात आहे.
 • सॅनिटाइझर, मास्क आणि हँडग्लोस कंडोमप्रमाणे अनिवार्य
 • व्हॉट्सअप ग्रुपमध्ये महिला आपल्या अडचणी शेअर करु शकतात.
 • प्रत्येक ब्रोथलवर कमीत कमी 2 टेंपरेचर गन असाव्यात.
 • महिला, मुलं आणि वृद्धांची वेळोवेळी स्क्रीनिंग
 • कोरोनाचे लक्षण आढळल्यावर महिलांना आयसोलेट केले जाईल.
Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser