आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीचा अमृतमहोत्सव:एसटीच्या कर्मचाऱ्यांना आगामी काही वर्षांच्या वेतनाचीही हमी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी कर्मचारी व आम्ही वेगळे नसून एका परिवाराचे सदस्य आहोत. सरकार व एसटी कर्मचारी वेगळे नसून पुढील काळात हातात हात घालून एकत्रित काम करेल. सध्याचे वेतन देण्यासोबत पुढील काही वर्षांच्या वेतनाचीही हमी दिलेली आहे. कोरोनाकाळात एसटी कर्मचाऱ्यांनी केलेले काम विशेष उल्लेखनीय आहे. मात्र, मधल्या काळातील एसटी संपाचा काळ माझ्यासाठी वेदनादायी होता, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केली आहे.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी एसटी महामंडळाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी ते दृक‌्श्राव्य प्रणालीद्वारे बाेलत होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, एसटी ताेट्यात आहे, असे अनेक वेळा सांगण्यात येते. परंतु ती नफ्यात आण्णयाच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागणार आहेत. खासगी बससेवेपेक्षा एसटीचे दर कमी असून सर्वसामान्यांची बस म्हणून ती आेळखली जाते. त्यामुळे हा ताेटा सरकारला सहन करावा लागताे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा गाजला. परंतुु सरकारने त्यांना सध्याचे वेतन देण्यासोबत पुढील काही वर्षांच्या वेतनाचीही हमी दिलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे मागण्या, व्यथा या ते सरकारकडे मागणार नाही तर कुणाकडे मांडणार? परंतु ज्या गोेष्टी शक्य नाहीत, त्याबाबत आपण कोणतेही आश्वासन देत नाही. कारण पैशाचे सोंग घेता येत नाही. ज्या गोष्टी शक्य आहेत त्या आम्ही केल्या. पुढील काळातही करत राहू. एसटीचे रूप बदलत असून रस्तेही चांगल्या प्रकारे होत आहेत. सर्वाधिक ई-बस वाढवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

एसटीचा इंधनाचा खर्च ६ हजार कोटींवर : अजित पवार
राज्यात एसटीचा पूर्वीचा इंधनावरील खर्च ३ हजार ४०० कोटी होता. मात्र, मधल्या काळात इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने हाच खर्च ५ ते ६ हजार कोटींपर्यंत वाढला आहे. मधल्या काळात सरकारने एसटीला मदत करण्यासाठी २ हजार ६०० कोटी रुपयांची मदतही दिली आहे. एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी काही फायदेशीर मार्गांची निवड करण्यात आली आहे. तसेच एसटी आगाराचाही वापर उत्पन्न वाढीसाठी केला जाणार आहे. तोट्यातील एसटी सेवा चांगल्या उत्पन्नात यावी या दृष्टीने आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील, असे मत या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व्यक्त केले.

रिक्षा कामगारांसाठी महामंडळ स्थापन करणार : परिवहनमंत्री
कोरोना कालावधीमध्ये रिक्षाचालकांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे, याची शासनाला जाणीव असून त्या काळात रिक्षाचालकांची नोंदणी करून काही प्रमाणात मदतही करण्यात आली आहे. आता त्यांची संख्या शासनाकडे उपलब्ध असून रिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी बुधवारी केली. दरम्यान, या वेळी पहिल्या ई बसचा उद्घाटन सोहळाही पार पडला. पहिली ई बस सेवा पुणे ते अहमदनगर मार्गावर सुरू करण्यात आली. या बसमध्ये ४२ जणांना प्रवास करता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...